श्रीलंकेविरुद्ध टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये २-० अशी बाजी मारलेल्या इंग्लंडच्या संघाने भारताविरुद्ध मालिकेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. चेन्नईच्या मैदानावर इंग्लंडचा कॅप्टन जो रुटने सेंच्युरी झळकावत पहिल्याच दिवशी टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आपली १०० वी टेस्ट मॅच खेळणाऱ्या जो रुटने या सामन्यात शतक झळकावत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं.
ADVERTISEMENT
टॉस जिंकत इंग्लंडने पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पहिल्या सेशनपासून इंग्लंडची टीम भारताच्या पुढे एक पाऊल कायम होती. ओपनिंग बॅट्समन रोरी बर्न्स आणि डोम सिबले यांनी ६३ रन्सची पार्टनरशीप करुन टीमला चांगली सुरुवात करुन दिली. यानंतर बर्न्स आणि लॉरेन्स यांना झटपट माघारी धाडण्यात भारताच्या बॉलर्सना यश आलं.
मात्र यानंतर मैदानावर कॅप्टन जो रुटने डोम सिबलेच्या साथीने भारतीय बॉलर्सची धुलाई करत इंग्लंडला पुन्हा एकदा भक्कम स्थितीत आणून ठेवलं. टीम इंडियाची जमेची बाजू म्हणजे स्पिनर बॉलिंग लाईनअप..पण जो रुटने भारताच्या स्पिन बॉलिंग लाईनअपला व्यवस्थित खेळून काढत भारतीय बॉलर्सच्या नाकी नऊ आणले.
दरम्यान भारत विरूद्ध इंग्लड पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवशी सामन्यावर इंग्लंडचं वर्चस्व आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या शतकामुळे धावसंख्या 263 पर्यंत पोहोचण्यास मदत झालीये. दिवसाअखेरीस इंग्लंड 3 बाद 263 धावा अशा स्थितीत आहे.
ADVERTISEMENT
