Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरही कोरोनाच्या विळख्यात, Twitter वरुन दिली माहिती

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वत: सचिनने आज (27 मार्च) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे. सध्या तेंडुलकर आपल्या घरातच क्वॉरंटाइन झाला आहे. याबाबत माहिती देताना सचिननं म्हटलं आहे की, त्याने स्वत:ला होम क्वॉरंटाईन केलं असून तो या साथीच्या आजारासंबंधी सर्व प्रोटोकॉल्स पाळत आहे. तसेच […]

Sachin Tendulkar's Viral Deep fake video What he said on it

Sachin Tendulkar's Viral Deep fake video What he said on it

मुंबई तक

• 05:05 AM • 27 Mar 2021

follow google news

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वत: सचिनने आज (27 मार्च) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे. सध्या तेंडुलकर आपल्या घरातच क्वॉरंटाइन झाला आहे. याबाबत माहिती देताना सचिननं म्हटलं आहे की, त्याने स्वत:ला होम क्वॉरंटाईन केलं असून तो या साथीच्या आजारासंबंधी सर्व प्रोटोकॉल्स पाळत आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहे. (sachin tendulkar also infected with corona)

हे वाचलं का?

दरम्यान, सचिनला जरी कोरोनाची लागण झाली असली तरी त्याचे कुटुंबीय मात्र कोरोनापासून सुरक्षित आहेत. सचिन कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ज्या रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

महाराष्ट्राची वाटचाल दुसऱ्या Lockdown च्या दिशेने ? मुख्यमंत्री म्हणाले…

सचिनने आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की, ‘कोरोनापासून बचाव करण्यासाठी आजपर्यंत मी सर्व उपाय करत आलोय. अनेकदा कोरोना चाचणी देखील करुन घेतली आहे. पण आज मला काही सौम्य लक्षणानंतर मी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलो आहे. घरातील इतर सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मी स्वत:ला घरीच क्वॉरंटाइन करुन घेतलं आहे. याबाबतचे सर्व प्रोटोकॉल्सचं पालन मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करत आहे. जे मला आणि देशातील अनेकांना यासाठी सहाय्य करत आहेत अशा आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना मनापासून धन्यवाद.’

दरम्यान, सचिन तेंडुलकर हा नुकताच रायपूरमध्ये आयोजित रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये खेळला होता. तो इंडिया लिजेंड्सचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात इंडिया लिजेंड्सने चॅम्पियनशीपचा किताब देखील पटकावला होता. दरम्यान, या सीरीजमधील प्रत्येक सामन्याच्या आधी खेळाडूंची कोरोना टेस्ट केली जात होती. सचिनने याचा व्हीडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता.

लसीकरणानंतरही ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ३६ हजार ९०२ नवीन कोरोना रुग्ण

दरम्यान, गेल्या २४ तासात राज्यात ३६ हजार ९०२ नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. आज राज्यात ११२ जणांनी कोरोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २ लाख ८२ हजार ४५१ सक्रीय रुग्ण असल्यामुळे राज्य सरकारसमोरील चिंतेत भर पडली आहे. जनतेने कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळले नाहीत तर नाईलाजाने येत्या काही दिवसांमध्ये अधिक कठोर निर्बंध लावावे लागतील असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपण बेड्स, आरोग्य सुविधा वाढवू मात्र डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार? हे लक्षात घेतले पाहिजे.

…तर राज्यातली आरोग्य व्यवस्थाही कमी पडेल! मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

राज्यात रविवारपासून नाईट कर्फ्यू लागू होणार

राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महत्वाच्या शहरांमधली गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी कडक उपाययोजना लागू करण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने रविवारी रात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्याची आरोग्य व्यवस्था कमी पडेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे असं म्हटलं आहे.

    follow whatsapp