सचिनची मुलगी Sara Tendulkar चं मॉडेलिंगमध्ये पदार्पण!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर हिने आता मॉडेलिंगमध्ये पदार्पण केलं आहे. सारा तेंडुलकरने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती एका कंपनीच्या जाहिरातीत दिसून आली आहे. साराने एका कपड्याच्या ब्रँडसाठी जाहिरात केली आहे. सारा सोशल मीडियावर नेहमीच आपले फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते. यावेळी देखील तिने आपल्या जाहिरातीचा व्हीडिओ शेअर […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:00 AM • 07 Dec 2021

follow google news

हे वाचलं का?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर हिने आता मॉडेलिंगमध्ये पदार्पण केलं आहे.

सारा तेंडुलकरने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती एका कंपनीच्या जाहिरातीत दिसून आली आहे.

साराने एका कपड्याच्या ब्रँडसाठी जाहिरात केली आहे.

सारा सोशल मीडियावर नेहमीच आपले फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते. यावेळी देखील तिने आपल्या जाहिरातीचा व्हीडिओ शेअर केला आहे.

सारा तेंडुलकरसह या जाहिरातीत आणखी दोन मॉडेल पाहायला मिळत आहेत. कंपनीकडून सारा तेंडुलकरला लाँच करताना फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

नुकतंच सारा तेंडुलकरचा एक स्पेशल डेट नाइट फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती बॉलिवूड अभिनेत्री कनिका कपूरसह दिसली होती.

सारा तेंडुलकर ही बहुदा लंडनमध्येच वास्तव्य करते. ती तेथील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

    follow whatsapp