Shafali Verma : चौकार-षटकारांची आतिषबाजी, WPLमध्ये शेफालीचा दिसला तुफानी अंदाज!

मुंबई तक

• 11:41 PM • 11 Mar 2023

महिला प्रीमियर लीगच्या (WPL) एका सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा 10 गडी राखून पराभव केला. सलामीवीर शेफाली वर्माने दिल्ली कॅपिटल्स संघासाठी जबरदस्त खेळी केली. शेफालीने अवघ्या 28 चेंडूत 10 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 78 धावा केल्या. पॉवरप्लेमध्येच दिल्लीने 87 धावा केल्या, यावरून शेफालीच्या तुफानी फलंदाजीचा अंदाज लावता येतो. शेफाली वर्माने मागे आरसीबीविरुद्धच्या सामन्यात केवळ […]

Mumbai Tak
Google CTA

हे वाचलं का?

महिला प्रीमियर लीगच्या (WPL) एका सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा 10 गडी राखून पराभव केला.

सलामीवीर शेफाली वर्माने दिल्ली कॅपिटल्स संघासाठी जबरदस्त खेळी केली.

शेफालीने अवघ्या 28 चेंडूत 10 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 78 धावा केल्या.

पॉवरप्लेमध्येच दिल्लीने 87 धावा केल्या, यावरून शेफालीच्या तुफानी फलंदाजीचा अंदाज लावता येतो.

शेफाली वर्माने मागे आरसीबीविरुद्धच्या सामन्यात केवळ 45 चेंडूंचा सामना करत 84 धावा केल्या होत्या.

दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी मिळालेलं 106 धावांचं लक्ष्य, त्यांनी 7.1 षटकांत पूर्ण केले.

दिल्लीकडून मारिजाने कॅपने 15 धावांत पाच विकेट घेतल्या आणि ती सामनावीर (Player of the match) ठरली.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा