Steve Smith: स्टीव्ह स्मिथ चमकला! गावसकर, लारासह जगातील 'या' 4 दिग्गज कर्णधारांचा विक्रम मोडला

मुंबई तक

• 05:51 PM • 29 Jan 2025

Steve Smith Completed 35th Century : श्रीलंकाविरुद्ध अप्रतिम फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने त्याच्या टेस्ट करिअरचं 35 वे शतक पूर्ण केलं. या चमकदार कामगिरीमुळे स्मिथ टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा जगातील सातवा खेळाडू बनला आहे.

Steve Smith 35th Test century

Steve Smith 35th Test century

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

टेस्ट क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास

point

सुनील गावसकर, ब्रायन लारासह या दिग्गजांचा रेकॉर्ड मोडला

point

स्टीव्ह स्मिथने या इनिंगमध्ये ठोकले 10 चौकार अन् षटकार...

Steve Smith Completed 35th Century : श्रीलंकाविरुद्ध अप्रतिम फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने त्याच्या टेस्ट करिअरचं 35 वे शतक पूर्ण केलं. या चमकदार कामगिरीमुळे स्मिथ टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा जगातील सातवा खेळाडू बनला आहे. याआधी स्मिथ संयुक्तपणे चार खेळाडूंसह सातव्या स्थानावर होता. परंतु, गाला येथे शतक ठोकून स्मिथने पाकिस्तानचा माजी कर्णधार यूनुस खान, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर, वेस्टइंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेला मागे टाकलं आहे. या चारही फलंदाजांनी टेस्ट क्रिकेटमध्ये अनुक्रमे 34-34 शतक केले आहेत. दरम्यान, आज 29 जानेवारीला श्रीलंकेविरोधात शतक पूर्ण केल्याने स्मिथच्या टेस्ट शतकांची संख्या 35 वर पोहोचली आहे.  

हे वाचलं का?

स्टीव्ह स्मिथने टेस्ट क्रिकेटमध्ये केला मोठा कारनामा

पहिल्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत स्मिथ नाबाद 104 धावांवर आहे. कांगांरूंसाठी चौथ्या क्रमांकावर मैदानात उतरलेल्या स्मिथने आज एकूण 188 चेंडूंचा सामना केला. याचदरम्यान, स्मिथने 55.31 च्या स्ट्राईक रेटने स्मिथने नाबाद 104 धावा केल्या. या इनिंगमध्ये स्मिथने 10 चौकार आणि एक षटकार मारला.

हे ही वाचा >> Dhananjay Munde : "...तर मी राजीनामा देणार", संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचं सर्वात मोठं विधान!

सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे खास विक्रम

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने टीम इंडियासाठी 1989 ते 2013 पर्यंत एकूण 200 सामने खेळले आहेत. याचदरम्यान सचिनने 51 शतकांची खेळी केलीय.

ऑस्ट्रेलियाकडून रिकी पॉन्टिंगने ठोकले सर्वाधिक शतक

ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकण्याचा खास कारनामा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे. त्याने 1995 ते 2012 पर्यंत 168 सामने खेळले आहेत. याचदरम्यान रिकीने 287 इनिंगमध्ये 41 शतक ठोकण्याची कामिगीरी केलीय.

हे ही वाचा >> Mahakumbh Stampede : कुणाची आई गेली, कुणाची पत्नी... गंगेच्या तिरावर नातेवाईकांचा आक्रोष

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 10 फलंदाज

  • 51 शतक - सचिन तेंडुलकर - भारत 
  • 45 शतक - जॅक्स कॅलिस - दक्षिण अफ्रीका 
  • 41 शतक - रिकी पॉन्टिंग - ऑस्ट्रेलिया 
  • 38 शतक - कुमार संगकारा - श्रीलंका 
  • 36 शतक - जो रूट - इंग्लंड 
  • 36 शतक - राहुल द्रविड - भारत 
  • 35 शतक - स्टीव्ह स्मिथ - ऑस्ट्रेलिया 
  • 34 शतक - यूनुस खान - पाकिस्तान 
  • 34 शतक - सुनील गावसकर - भारत 
  • 34 शतक - ब्रायन लारा - वेस्टइंडीज 
  • 34 शतक - महेला जयवर्धने - श्रीलंका