Dhananjay Munde : "...तर मी राजीनामा देणार", संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचं सर्वात मोठं विधान!
Dhananjay Munde On Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपचं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागली केली जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धनंजय मुंडेंनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची घेतली भेट
धनंजय मुंडेंची संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया
राजीनाम्याबाबत धनंजय मुंडे काय म्हणाले?
Dhananjay Munde On Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपचं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागली केली जात आहे. अंजली दमानीयांनी राजीनाम्याची मागणी केलीय. धनंजय मुंडेंनी 51 दिवसात राजीनामा का दिला नाही, असं सुप्रिया सुळेही म्हणाल्या होत्या, यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना कुठे जर दोषी वाटत असेल, तर त्यांनी राजीनामा मागावा. राजनीमा देणार. पण मी दोषी आहे की नाही, हे ते सांगू शकतील..या सर्व गोष्टी क्लियर झाल्या पाहिजेत. 51 दिवस मला टार्गेट केलं जात आहे. मी पार्टीचा निष्ठावंत आहे. मी महायुतीच्या प्रचारातील एक प्रमुख आहे. माझी नैतिकता लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे. जी घटना घडली आहे, त्याबाबत मी अतिशय प्रामाणिकपणाने बोललोय. मला स्वत:ला नैतिकतेने वाटत नाही की, मी दोषी आहे. माझा दोष सांगावा तर लागेल".
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 51 दिवस झाले आहेत, आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले, या 51 दिवसात मी एकच गोष्ट बोललोय, सरपंच देशमुखांची जी निर्घृण हत्या झाली आहे. यामध्ये जे कोणी हत्या करणारे आणि दोषी असतील, जे तपासात सापडतील त्यांना फासावर चढवा. मोठ्यातली मोठी शिक्षा द्या, ही माझी मागणी आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाज जोशी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे म्हणाले, महाराष्ट्रात मी अन्न व नागरी मंत्री म्हणून मी जबाबदारी घेतली त्यानंतर पहिल्यांदाच केंद्रातील अन्न व नागरी पुरवठ्या मंत्र्यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील अन्न व नागरी पुरवठ्यासंबंधीत ज्या काही अडचणी आहेत, त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होणं फार आवश्यक होती. लोकसंख्या वाढल्यानंतर लाभार्थ्यांना जेवढा लाभ मिळाला पाहिजे, आता महाराष्ट्रातील फक्त 7 कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळतो. जनसंख्या वाढली आहे, तर साडेआठ कोटींपेक्षा जास्त लोकांना लाभ मिळाला पाहिजे. आज ज्या लाभार्थ्यांना रेशनच्या फॉर्मेटवर यायचं आहे, तर त्यांना पूर्ण माहिती द्यावी लागते. ऑनलाईन समस्या आहेत, या सर्व गोष्टी इन डिटेल आहेत. आठ-नऊ महत्त्वाचे विषय होते. त्यासंदर्भात चर्चा होणं आवश्यक होतं.
हे ही वाचा >> Mahakumbh Stampede : कुणाची आई गेली, कुणाची पत्नी... गंगेच्या तिरावर नातेवाईकांचा आक्रोष
अन्न व नागरी पुरवठ्या संदर्भात अनेक लभार्थी ठरत असूनही त्यांना लाभ मिळत नाही. ही फार मोठी समस्या आहे. ही समस्या सुटली पाहिजे. लाभार्थी हे सबंध महाराष्ट्रातील लाभार्थी आहेत. पण प्रामुख्याने जिथे ऑनलाईनची समस्या आहे, जिथे रेशन कार्डच्या नाव लावण्याच्या समस्या आहेत. या समस्या मागासलेल्या महाराष्ट्रातही आहेत आणि शहरी भागातही आहेत. लाखो लाभार्थी अन्न सुरक्षेपासून वंचित राहत होते. आता लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे लाभार्थ्यीची संख्याही वाढायला पाहिजे, असंही मुंडे म्हणाले.
हे ही वाचा >> CM Yogi Aadityanath : "परिस्थिती नियंत्रणात, पण गर्दीचा जोर कायम...", चेंगराचेंगरनंतर योगींचं काय आवाहन?
आम्हाला रेशन द्यायचे आहे, पण सर्व्हर डाऊनमुळे लोक घेऊ शकत नाहीत, अशा परिस्थितीत आम्हाला अडचणी आहेत. रेशन घेणारे रेशन घेत नाहीत. त्याला अडचण सर्व्हर डाऊनची आहे. देणारा द्यायला तयार आहे. त्यामुळे आमची संख्या कमी केली. या समस्या फार मोठ्या प्रमाणात आहेत.महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ, असे मागासलेले जिल्हे आहेत. जिथे सहा सहा महिने लेबर उस तोडायला बाहेर जातो. त्यावेळी त्याचं रेशन गावात मिळत नाही. कारण तो सहा महिने तिकडे असतो. त्यामुळे जिथे जाईल तिथे रेशन मिळावं,हे आता चालू झालं आहे. हे आणखी व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी चर्चा झाली, असं धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
