सूर्याचा खराब फॉर्म,चार खेळाडू जखमी…वर्ल्डकपआधी टीम इंडिया टेन्शनमध्ये

मुंबई तक

24 Mar 2023 (अपडेटेड: 24 Mar 2023, 12:00 PM)

Team India | World Cup : ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणार असलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची चिंता वाढणार आहे. काय असणार रणनीती?

Mumbaitak
follow google news

Team India | World Cup :

हे वाचलं का?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 21 धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे टीम इंडियाने वनडे मालिका 1-2 ने गमावलीच. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमधील भारतीय संघाचे नंबर-1 रँकिंगही गेले. ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची मानली जात होती, पण भारतीय खेळाडूंनी या मालिकेत केलेली कामगिरी चिंतेत टाकणारी आहे. टीम इंडियाची टॉप ऑर्डर एकूणच फ्लॉप ठरली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मिचेल स्टार्कपुढे भारताने ज्या प्रकारे गुडघे टेकले होते, ते बघणं खूपच निराशजनक होते. पहिल्या सामन्यातही भारतीय संघाची अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. (In this way, the concern of the Indian team will increase in the ODI World Cup to be held in India in the month of October-November this year)

अशात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणार असलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची चिंता वाढणार आहे. मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली, पण त्याला एकही धाव करता आली नाही. तिन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव पहिल्या चेंडूवर बाद झाला. मुंबई आणि विशाखापट्टणम वनडेमध्ये मिचेल स्टार्कने सूर्याचा बळी घेतला. तर चेन्नई एकदिवसीय सामन्यात त्याला फिरकीपटू अॅश्टन एगरने बाद केले.

Asia Cup : भारतासाठी पाकिस्तानचा मध्यममार्ग; सुचवला नवीन तोडगा

खेळाडूंच्या दुखापतीही चिंतेचे कारण

खराब कामगिरीसोबतच खेळाडूंच्या दुखापती हेही भारतीय संघासाठी चिंतेचं कारण आहे. संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय निवडकर्त्यांनी जानेवारीत होणाऱ्या विश्वचषकासाठी २० खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय घेतला होता. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर, अष्टपैलू दीपक चहर याशिवाय प्रसिद्ध कृष्णाच्या नावाचाही निवड करण्यात आली होती. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की यातील तीन खेळाडू अजूनही दुखापतींशी झुंजत आहेत. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला होता आणि तो आयपीएलमध्येही खेळण्याची खात्री नाही. त्यामुळे तो बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर होणार आहे.

संजू सॅमसनला संघात स्थान नाही? कॉंग्रेसचा मोठा नेता चांगलाच भडकला

ऑगस्ट महिन्यापर्यंत बुमराहच्या सरावात परतण्याची आशा नाही. आणखी एक वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचीही अशीच स्थिती असून तो स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे आयपीएलमधून बाहेर आहे. चांगली गोष्ट म्हणजे दीपक चहर सध्या तंदुरुस्त दिसत असून आयपीएल 2023 मध्ये सहभागी होणार आहे. तसे, दीपक चहरचा इतिहास देखील योग्य नाही आणि तो अनेक वेळा जखमी झाला आहे. टीम इंडियाच्या जखमी खेळाडूंच्या यादीत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे नाव देखील समाविष्ट आहे. पण ऋषभ पंत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार अपघातात जखमी झाला आहे. यातून सावरुन पंत कधी परतणार हे ठरलेले नाही. आयपीएलचा पुढील हंगाम 31 मार्चपासून आयोजित केला जात आहे, त्यामुळे BCCI आणि फ्रँचायझी संघांनी खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे असेल.

टीम इंडियातील जखमी खेळाडू :

1. जसप्रीत बुमराह (पाठीला दुखापत)
2. प्रसिद्ध कृष्णा (स्ट्रेस फ्रॅक्चर)
3. ऋषभ पंत (कार अपघातात जखमी)
4. श्रेयस अय्यर (पाठीला दुखापत)

    follow whatsapp