मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) रणधुमाळीत मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदे गट) मुंबईतील 90 जागांवर निवडणूक लढवत आहे. महायुतीमध्ये भाजप सोबत जागावाटपाचा तिढा सुटला असून, भाजप 137 जागांवर लढणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी टाळण्यासाठी खबरदारी घेत थेट उमेदवारांना एबी फॉर्म वाटप सुरू केले होते. त्यामुळे अधिकृत यादी जाहीर न करता थेट उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते. काल (30 डिसेंबर 2025) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, तरीही नेमकी कोणत्या वॉर्डात कोणाला उमेदवारी मिळाली हे स्पष्ट झालं नव्हतं. मात्र, आता शिवसेनेची 90 उमेदवारांची यादी ही समोर आली आहे.
ADVERTISEMENT
जागावाटपाचा फॉर्म्युला हा सोमवारी रात्री उशिरा निश्चित झाला होता. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी याची घोषणा केली होती. महायुतीने 150 पेक्षा अधिक जागा जिंकून मराठी महापौर बसवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. दुसरीकडे, शिवसेना UBT आणि मनसे यांची युती झाली असून, ठाकरेंची शिवसेना सुमारे 160-165 जागा लढवणार आहे.
हे ही वाचा>> मुंबई महानगरपालिका : ठाकरेंची पहिली उमेदवार यादी, सुनील प्रभू आणि विनायक राऊतांच्या मुलाला मैदानात उतरवलं
दुसरीकडे शिंदे गटाने ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात मजबूत उमेदवार उतरवले आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी रात्री उशिरापर्यंत एबी फॉर्म वाटप सुरू होते.
पाहा शिवसेना (शिंदे गट) यांची मुंबईतील उमेदवारांची संपूर्ण यादी
शिवसेनेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा>>View PDF
निवडणुकीचे वेळापत्रक:
- उमेदवारी अर्ज दाखल: 30 डिसेंबर 2025 पर्यंत
- अर्ज मागे घेण्याची मुदत: 2 जानेवारी 2026
- अंतिम यादी आणि चिन्ह वाटप: 3 जानेवारी 2026
- मतदान: 15 जानेवारी 2026
- मतमोजणी: 16 जानेवारी 2026
हे ही वाचा>> दोन्ही शिवसेनेत घराणेशाही, सदा सरवणकरांचा मुलगा अन् मुलगीही निवडणूक लढणार, युतीचा फॉर्म्युलाही समोर
मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत. बहुमतासाठी 114 जागांची गरज आहे. 2017 च्या निवडणुकीत शिवसेना (अविभाजित) ने 84 आणि भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. यंदा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे, कारण अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सध्या मुंबईत स्वतंत्र निवडणूक लढवत आहे.
ADVERTISEMENT











