महाराष्ट्र हादरला! 13 वर्षीय दिव्यांग मुलीवर 55 वर्षीय पुरूषाकडून अत्याचार, हादरवून टाकणारी घटना

Nashik Crime : नाशिकच्या मालेगावात एका 55 वर्षीय वृद्ध नराधमाने एका 13 वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Nashik Crime

Nashik Crime

मुंबई तक

31 Dec 2025 (अपडेटेड: 31 Dec 2025, 04:39 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

13 वर्षीय विकलांग मुलीला निर्जनस्थळी नेले आणि...

point

मालेगावात 13 वर्षीय विकलांग मुलीवर 55 वर्षीय पुरुषाकडून लैंगिक अत्याचार

Nashik Crime : राज्यातील नाशिकमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. नाशिकच्या मालेगावात एका 55 वर्षीय वृद्ध नराधमाने एका 13 वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीला दोन दिवसांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. आरोपीचं नाव विजय खैरनार असल्याची माहिती समोर आली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : आई पोलीस दलात सक्रिय, लेकीवर सावत्र बापाने बंद दाराआड केला अत्याचार, लाज आणणारी घटना

नेमकं काय घडलं? 

घडलेल्या घटनेनुसार, आरोपी दीपक धनराज छाजेड यांनी मुलीला एका स्कूटरवर बसवले आणि एका निर्जनस्थळी नेले. नंतर त्या ठिकाणी अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच, पीडितेला पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि इतर काही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

13 वर्षीय विकलांग मुलीला निर्जनस्थळी नेले आणि...

सर्वात भयावह परिस्थिती अशी की, 13 वर्षीय मानसिकदृष्ट्या विकलांग असणाऱ्या मुलीची आई ही तिच्या घरी गेली त्याच घरात ती काम करत होती. आरोपीने परिस्थितीचा फायदा घेत मुलीला एका निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणचा अधिक शोध घेत आहे.

अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नाशिकच्या मालेगावातील ही पहिलीच घटना नसून यापूर्वी अशा अनेक घटना घडल्याचं चित्र होतं. राज्यभरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. यामुळे आता महिलांसोबतच अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा : वर्षाच्या अखेरीस 'या' राशीतील लोकांना मिळणार आपलं प्रेम, तर काहींना होणार पैशांचा लाभ

16 डिसेंबर रोजी डोंगराळे गावात साडेतीन वर्षांच्या मुलींवर अत्याचार करून नंतर तिचा खून करण्यात आला. याच घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली, याच शहरात काय घडेल यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय.

    follow whatsapp