Sanjay Raut : मुंबई महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घराच्या बाहेर एका गाडीवर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याचा मजकूर आहे. राऊतांच्या घराबाहेर एक धुळखात पडलेल्या गाडीवर 'आज हंगामा होगा, 12 बजे ब्लास्ट होगा', असा मजकूर लिहिण्यात आला होता, या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी 31 डिसेंबर रोजी घडल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाला उदयनराजे भोसले यांनी दिलं फ्लाईंग किस, म्हणाले 'पार्टी पाहिजे पार्टी'
'रात 12 बजे ब्लास्ट होगा, राऊतांच्या घराबाहेर काय घडलं?
घडलेल्या घटनेनुसार, खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर एक धुळखात पडलेली गाडी होती. त्याच गाडीवर बॉम्बस्फोट करेन अशा धमकीचा मजकूर लिहिण्यात आला होता. 'आज हंगामा होगा, रात 12 बजे ब्लास्ट होगा' असं त्या कारच्या काचेवर लिहिण्यात आलं होतं. संबंधित कारच्या मागील काचेवर 'CST में बॉम्ब ब्लास्ट होगा', असा मजकूर लिहिण्यात आला होता, तसेच खालील बाजूला एक स्माईलचं इमोजी काढण्यात आलं होतं.
बॉम्ब स्फोट पथक आणि मुंबई पोलीस संजय राऊत यांच्या घराबाहेर
संबंधित प्रकार समोर आल्यानंतर तातडीने या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. बॉम्ब स्फोट पथक आणि मुंबई पोलीस हे संजय राऊत यांच्या घराबाहेर दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु असून अशा घटना घडू लागल्याचं चित्र आहे. या गाडीवरील एका मेसेजमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या घरी मुंबई पोलिसांसह बॉम्बशोधक पथकांनी धाव घेतली.
हे ही वाचा : आई पोलीस दलात सक्रिय, लेकीवर सावत्र बापाने बंद दाराआड केला अत्याचार, लाज आणणारी घटना
नजीकचा सीसीटीव्ही तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. हे असं कृत्य कोणी केलं त्याची पोलीस सध्या माहिती घेत आहेत. हा धमकीचा मेसेज कोणी लिहिला याची पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली आहे.
ADVERTISEMENT











