शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाला उदयनराजे भोसले यांनी दिलं फ्लाईंग किस, म्हणाले 'पार्टी पाहिजे पार्टी'

Satara News : शिवसेनेच्या नगराध्यक्षाला उदयनराजेंकडून कडकडित मिठी मारत फ्लाईंग किस देखील देण्यात आलं.

Satara News

Satara News

मुंबई तक

31 Dec 2025 (अपडेटेड: 31 Dec 2025, 06:05 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेनेच्या नगराध्यक्षाला उदयनराजेंकडून कडकडिच मिठी

point

नगराध्यक्षाकडून उदयनराजे यांना फ्लाईंग किस 

Satara News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कराड नगरपालिकेच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चेचे विषय ठरले. यानंतर आता सातारच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांना सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी फ्लाईंग किस दिले आणि घट्ट मिठी मारली होती. नंतर उदयनराजेंना आनंदाश्रू अनावर झाले. यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातील कराडच्या राजकारणाबाबत एका चर्चांना उधाण आलं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : गुंडांच्या घरात उमेदवारी देण्याची स्पर्धा, शरद मोहोळच्या पत्नीला भाजपचं तिकिट! अजितदादांनीही तेच केलं

शिवसेनेच्या नगराध्यक्षाला उदयनराजेंकडून कडकडिच मिठी

शिवसेना आणि शरद पवार गटाच्या युतीतून कराड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांना उदयनराजे भोसले यांनी मध्यरात्री भेट दिली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये गळाभेट झाली आणि उदयनराजेंना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. राजेंद्रसिंह यादव आणि विजय यादव हे दोन्ही बंधू छत्रपती उदयनराजेंचे जुने मित्र आहेत. नगरपालिकेत भाजपविरोधात दोन्ही बंधूंना उमेदवारी जाहीर केल्याने उदयनराजे भोसले या निवडणूक प्रक्रियेपासून पूर्णपणे दूरच होते.

हे ही वाचा : महाराष्ट्र हादरला! 13 वर्षीय दिव्यांग मुलीवर 55 वर्षीय पुरूषाकडून अत्याचार, हादरवून टाकणारी घटना

नगराध्यक्षाला उदयनराजे यांनी दिलं फ्लाईंग किस 

या निकालानंतर मित्र नगराध्यक्ष झाल्याची माहिती मिळताच उदयनराजे यांनी पहिल्यांदाच त्यांची गळाभेट घेतली. “पार्टी पाहिजे, पार्टी पाहिजे” असे म्हणत त्यांनी राजेंद्रसिंह यादवांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. त्यांना फ्लाईंग किस देखील दिला आणि नंतर ते भावूक झाले. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षाची घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरत आहे.

    follow whatsapp