टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडचा ३१७ धावांनी धुव्वा उडवला. या कामगिरीसह विराटने धोनीच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. कॅप्टन म्हणून विराट कोहलीचा घरच्या मैदानावरचा हा २१ वा कसोटी विजय होता. याआधी हा विक्रम धोनीच्या नावे जमा होता.
ADVERTISEMENT
स्पिनर्सना मदत करणाऱ्या पिचचा पुरेपूर फायदा घेण्यात भारताला यश आलं. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या प्लेअर्सनी ऑलराऊंड खेळ करत इंग्लंडला सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये मोईन अली आणि कॅप्टन जो रुट यांनी एकाकी झुंज दिली, पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.
अक्षर पटेलने दुसऱ्या इनिंगमध्ये ५ विकेट्स घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. आश्विनने दुसऱ्या इनिंगमध्ये ३ तर कुलदीप यादवने २ विकेट घेत अक्षरला चांगली साथ दिली. यानंतर टीम इंडिया तिसऱ्या टेस्ट मॅचसाठी अहमदाबादला रवाना होणार आहे. जगातलं सर्वात मोठं क्रिकेटचं स्टेडीअम म्हणून ओळख असलेल्या मोटेरा मैदानावर ही टेस्ट मॅच डे-नाईट खेळवली जाणार आहे.
ADVERTISEMENT
