राशीभविष्य : जूनमध्ये सूर्य आणि गुरूची युती, 'या' राशीच्या लोकांची लागणार लॉटरी

मुंबई तक

Astrology 2025 : जून महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आणि गुरु यांच्यात युती झाली आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीचा परिणाम हा काही राशींवर होणार आहे.

ADVERTISEMENT

social share
google news
Astrology

1/6

ज्योतिषशास्त्राने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात म्हणजेच आज 1 जून पासून सूर्य हा गुरुमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याला मान सन्मान आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. 
 

Astrology

2/6

सूर्य आणि गुरू या दोन्ही ग्रहाची युती मिथुन राशीत आजपासून झाली आहे. यामुळे याचा परिणाम हा तीन राशींवर होणार आहे. अशा नेमक्या कोणत्या तीन राशी आहेत ते जाणून घेऊयात. त्या राशींना होणाऱ्या लाभाबाबत माहिती जाणून घेऊयात. 
 

Astrology

3/6

कन्या राशी

गुरू आणि सूर्य हे दोन ग्रह एकत्र आल्याने कन्या राशीतील लोकांच्या करिअरसाठी चांगला लाभ होणार आहे. नोकरीसाठी चांगला योग आहे. नोकरदार वर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी निर्माण होईल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला लाभ मिळणार आहे. आपल्या कामात मेहनत दाखवण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. 

Astrology

4/6

मीन राशी

मीन राशीतील लोकांच्या संपत्ती आणि सुखसोयींमध्ये चांगली वाढ निर्माण होणार आहे. मीन राशींसाठी विशेषत: फायदेशीर ठरु शकते. तुमच्या सुखसोयीमध्ये आणि सुविधेत चांगली वाढ होणार आहे. नोकरदार वर्गात चांगली पदोन्नतीची संधी निर्माण होईल. तसेच आपल्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल.
 

Astrology

5/6

तूळ राशी 

तूळ राशींच्या लोकांना चांगला योग निर्माण झाला आहे. तुमच्या राशीच्या नवव्या घरात तयार होणारे हे संयोजन प्रगतीच्या नवीन संधी देतील. या काळातील परदेश दौरा किंवा विशेष धार्मिक यात्रांचा सहवास लाभेल. व्यापारी वर्गाला नवीन करार मिळवण्याची आणि मोठा करार मिळवण्याची शक्यता आहे. तूळ राशीतील लोकांना शुभकार्यात सहभागी होण्यासाठीचे योग चांगले आहेत.
 

Astrology

6/6

सूर्य आणि गुरू ग्रहाचे विशेष संयोजन काही राशींसाठी चांगली बातमी घेऊन येतील. ग्रहांचे परिणाम व्यक्तीच्या कुंडलीवर अवलंबून असतात. योग्य मार्गदर्शनासाठी चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. 
 

रिलेटेड चित्र गॅलरी

follow whatsapp