'या' राशीतील लोकांना साडेसातीचा फेरा, ग्रहण दोष योगामुळे तर... तुमची राशीवर होणार परिणाम?
Astrology : ग्रहण योग प्राप्त झाल्याने त्याचा काही परिणाम हा काही राशीतील लोकांवर परिणाम होणार आहे. नेमका काय परिणाम होईल ते जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राहू आणि चंद्राची युती

ग्रहण योग प्राप्त होणार

'या' राशीतील लोकांवर परिणाम होणार
Astrology : राहू आणि चंद्राची युती ही 13 जुलै रोजी कुंभ राशीत झाली आहे. याच युतीमुळे एक ग्रहण योग प्राप्त झाल्याचं ज्योतिषशास्त्र सांगत आहे. या ग्रहणामुळे काही राशीतील लोकांच्या आयुष्याला ग्रहण लागण्याची शक्यता आहे. त्यात काही तीन राशींचा समावेश करण्यात आलेला आहे.
हेही वाचा : Mumbai Weather: जरा जपून..मुंबईला जाताय? शहरातील 'या' भागात मुसळधार पाऊस घालणार धुमाकूळ
सिंह राशी :
सिंह राशीतील लोकांच्या आयुष्यातील ग्रहण हे सातव्या स्थानी आहे. वैवाहिक जीवनात तणाव, तसेच कौटुंबिक जीवनात कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. अचानकपणे खर्च होऊ शकतो. आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतील.
कुंभ राशी :
कुंभ राशीतील लोकांच्या आयुष्यात याचा विशेषकरून परिणाम होणार आहे. नोकरीत अस्थिरता, वरिष्ठांशी मतभेद आणि अपघात होण्याची शक्यता आहे. नोकरीत अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, वाहन चालवत असाल तर काळजी घ्यावी, असं ज्योतिषशास्त्र म्हणत आहे.
धनु राशी :
धनु राशींच्या लोकांसाठी हा योग तिसऱ्या तयार होतोय. त्यामुळे कैटुंबिक कलह होईल. यामुळे भावंडांमध्ये ताटातूट होण्याची शक्यता आहे. यामुळे समाजात आपली प्रतिष्ठी खालावली जाईल, असा अंदाज ज्योतिषशास्त्राने वर्तवलेला आहे. यामुळे महत्त्वपूर्ण कामांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण होणार आहे.