Personal Finance: एकाच कंपनीत सलग 5 वर्ष काम केलं तरच Gratuity मिळते का? जाणून घ्या सत्य!
Gratuity Rules: ग्रॅच्युइटी मिळविण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. अनेकदा कर्मचाऱ्यांच्या मनात हा प्रश्न राहतो की ग्रॅच्युइटी कधी आणि कोणत्या अटींवर मिळते. यासाठी एकाच कंपनीत किमान ५ वर्षे सतत काम करणे आवश्यक आहे असा सर्वसाधारण समज आहे.
ADVERTISEMENT

Personal Finance Tips for Gratuity Rules: कर्मचाऱ्याला पगार, पेन्शन आणि पीएफ व्यतिरिक्त ग्रॅच्युइटीचा (Gratuity) लाभ देखील मिळतो. Gratuity हे एक प्रकारचं बक्षीस आहे. जे कंपनी दीर्घकाळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देते. हा निवृत्ती लाभांचा एक भाग आहे, जो पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीमध्ये समाविष्ट असतो. यामध्ये, कर्मचाऱ्याच्या पगारातून एक छोटासा भाग कापला जातो, तर मोठा भाग कंपनी देते.
ग्रॅच्युइटी मिळविण्यासाठी, काही अटी पूर्ण कराव्या लागतात. अनेकदा कर्मचाऱ्यांच्या मनात हा प्रश्न राहतो की Gratuity कधी आणि कोणत्या अटींवर मिळते. सामान्य समजुती अशी आहे की यासाठी एकाच कंपनीत किमान 5 वर्षे सतत काम करणे आवश्यक आहे. परंतु वास्तव थोडे वेगळे आहे. जर कर्मचारी नोकरी बदलतो, निवृत्त होतो किंवा कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडतो परंतु तो जर Gratuity चे नियम पूर्ण करत असेल तर त्याला Gratuity चा लाभ मिळतो.
Gratuity कधी दिली जाते?
पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, 1972 अंतर्गत, जर एखाद्या कंपनीत 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील, तर तिथे काम करणारा प्रत्येक व्यक्ती त्यासाठी पात्र आहे. नियमानुसार, Gratuity मिळविण्यासाठी तुम्हाला 5 वर्षे पूर्ण करणे आवश्यक नाही. जर तुम्ही एकाच संस्थेत 4 वर्षे 240 दिवस सतत काम केले असेल, तर तुम्ही Gratuity साठी पात्र व्हाल.
कोळसा किंवा इतर खाणी किंवा भूमिगत प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्यांसाठी, 4 वर्षे 190 दिवस पूर्ण केल्यानंतरच 5 वर्षांचा कार्यकाळ विचारात घेतला जातो. कायद्यानुसार, जमिनीखाली काम करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांना 4 वर्षे आणि 190 दिवसांनंतरच Gratuity मिळण्यास पात्र मानले जाते.










