Personal Finance: चिंता वाढेल अशीच बातमी.. तुमचे 'अच्छे दिन' हे कर्जांवर, कारण..

रोहित गोळे

Personal Finance GDP and Saving: CareEdge अहवालानुसार, भारतातील देशांतर्गत बचत गेल्या 3 वर्षांपासून कमी होत आहे. लोक कर्ज घेऊन जगत आहेत. आर्थिक संकटामागील सत्य जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Personal Finance
Personal Finance
social share
google news

Personal Finance Tips for Saving: "रिण काढून सण करणं..." ही आता फक्त म्हण राहिलेली नाही, तर आजची वास्तविकता बनली आहे. CareEdge Ratings च्या ताज्या अहवालात एक धक्कादायक आर्थिक सत्य उघड झाले आहे. भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबे सलग तिसऱ्या वर्षी बचत करू शकत नाहीत, उलट त्यांच्यावरील कर्जाचा भार वाढत आहे.

2014-15 मध्ये देशांतर्गत बचत जीडीपीच्या 32.2% होती, तर 2023-24 मध्ये ती कमी होऊन 30.7% झाली. इतकेच नाही तर गेल्या दशकात भारतातील वैयक्तिक कर्जे (Personal Loan) दुप्पट झाली आहेत. सध्याच्या परिस्थितीत, जीडीपीच्या तुलनेत देशांतर्गत बचत 18.1% पर्यंत कमी झाली आहे, तर लोक जीडीपीच्या 6.2% कर्ज म्हणून घेत आहेत.

घरगुती खर्चासाठी कर्ज घेतले जात आहे आणि EMI आणि क्रेडिट कार्डच्या मदतीने जीवनशैली चालवली जात आहे. हा अहवाल EMI च्या गराड्यात अडकून जीवन जगणाऱ्या शहरी मध्यम आणि निम्न मध्यमवर्गाचे सत्य सांगतो.

राजकीय प्रतिक्रियाही तीव्र

काँग्रेसने या अहवालाला सरकारच्या 'अच्छे दिन'च्या आश्वासनाविरुद्ध एक शस्त्र बनवले आहे. जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मोदी सरकारच्या काळात उत्पन्न कमी झाले, महागाई वाढली, बचत कमी झाली आणि कर्ज वाढले.

हे वाचलं का?

    follow whatsapp