Personal Finance: शेअर्स, सोने की रिअल इस्टेट, 'ही' गुंतवणूक ठरली पैसे छापायचं मशीन!

रोहित गोळे

Best Investment Option: सोने हा शतकानुशतके भारतीयांचा आवडता गुंतवणूक पर्याय आहे. गेल्या काही वर्षांत लोक शेअर बाजार आणि मालमत्तेतही भरपूर पैसे गुंतवत आहेत. पण या तीन गुंतवणूक पर्यायांपैकी कोणत्या पर्यायाने गुंतवणूकदारांना जास्त नफा दिला आहे? जाणून घ्या...

ADVERTISEMENT

personal finance shares gold or property which investment has been the most profitable in 20 years
Personal Finance
social share
google news

Personal Finance Tips for Best Investment Option: शेअर बाजार, सोने आणि स्थावर मालमत्ता हे दशकांपासून गुंतवणूकदारांचे आवडते गुंतवणूक पर्याय आहेत. या तिन्ही मालमत्तांमध्ये भरपूर पैसे गुंतवले जातात. पण, तुम्हाला माहिती आहे का की जर तुम्ही वीस वर्षांपूर्वी शेअर्स, सोने किंवा रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवले असते तर तुम्हाला जास्त पैसे कुठून मिळाले असते? चला याचबाबत सविस्तर जाणून घेऊया. 

2005 मध्ये, जर तुम्ही या तिन्हींमध्ये पैसे गुंतवले असते तर तुम्हाला शेअर्स आणि सोने यातून जास्त परतावा मिळाला असता. परताव्याच्या बाबतीत, मालमत्ता म्हणजेच रिअल इस्टेट या दोन्हींपेक्षा खूप मागे आहे. हे पहिल्यांदाच घडले नाही. जरी तुम्हाला वाटत असेल की मालमत्तेचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, तरीही रिअल इस्टेट कधीही शेअर बाजाराच्या परताव्यावर मात करू शकलेलं नाही.

काही प्रसिद्ध झालेल्या अहवालांच्या आकडेवारीनुसार, गेल्या 20 वर्षांत 30 जून 2025 पर्यंत, शेअर बाजाराने (Nifty 50 TRI)दरवर्षी सरासरी 14.4% परतावा दिला आहे. म्हणजेच, वीस वर्षांत, शेअर बाजारात गुंतवलेले पैसे 14.7 पट वाढले आहेत. उदाहरणार्थ ज्याने 1 लाख रुपये गुंतवले होते त्याचे 14.7 लाख रुपये झाले आहेत. 

दुसरीकडे या काळात सोन्याने 14.4% परतावा दिला आहे आणि पैशाचा गुणक 14.8 पट होता. परंतु 15 वर्षांच्या सीएजीआरच्या बाबतीत, सोने शेअर बाजाराच्या मागे राहिले आहे. या काळात सोन्याने 11.1% CAGR दिला आहे, तर निफ्टी 50 ने 12.4% परतावा दिला आहे. रिअल इस्टेटने 20 वर्षांत फक्त 7.7% सीएजीआर परतावा दिला आहे आणि पैशाची वाढ फक्त 4.4 पट झाली आहे.

अल्पावधीत सोन्याची चमक अधिक वाढली

अल्पावधीत (1-3 वर्षे) सोन्याने प्रचंड अस्थिरता दर्शविली आहे. सोन्याने गुंतवणूकदारांना एका वर्षात 45% आणि 3 वर्षात 25.2% परतावा दिला आहे. दुसरीकडे, शेअर बाजाराचा परतावा यापेक्षा कमी आहे.

शेअर बाजारातील गुंतवणूक आणि परतावा

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2005 मध्ये भारतीय शेअर बाजारात म्हणजेच निफ्टी 50 टीआरआयमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ते आतापर्यंत काढले नसते, तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 14.7 लाख रुपये झाले असते. जर 5 लाखांची गुंतवणूक केली असती तर त्याचे 73.5 लाख रुपये झाले असते आणि 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याची किंमत ही 1.47 कोटी रुपये एवढी झाली असती.

सोन्यामधील गुंतवणूक आणि परतावा

20 वर्षांत सोन्यातील गुंतवणूक देखील साधारण शेअर बाजाराप्रमाणेच राहिली असती. जर 20 वर्षांपूर्वी सोन्यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आता आपल्याला 14.8 लाख रूपये, 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर 74 लाख रूपये आणि 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर ती 1.48 कोटी रूपये झाली असती. 

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक आणि परतावा

रिअल इस्टेटमध्ये गुंतवलेले 1 लाख रूपये हे गेल्या 20 वर्षांत फक्त 4.4 लाख झाले आहेत. तर ५ लाख रुपयांचे रूपांतर 22 लाखात झाले आणि 10 लाख रुपयांचे रूपांतर 44 लाख रूपये झाले.

Personal Finance सीरीजमधील या बातम्याही वाचा:

1. Personal Finance: पेन्शनबाबत येऊ शकते एक मोठी आणि चांगली बातमी, आतापासूनच सगळा प्लॅन ठरवून ठेवा!

2. Personal Finance: 50 व्या वर्षीच व्हा निवृत्त, तरीही मिळेल दर महिन्याला 1 लाख रूपये.. SWP प्लॅन आहे तरी काय?

3. Personal Finance: तुमच्या मुलाच्या जन्मापासून SIP करा सुरू, मिळतील 1 कोटी.. 21x10x12 फॉर्म्युला आहे जबरदस्त

4. Personal Finance: घर खरेदी करावं की भाड्याने घ्यावं.. काय चूक, काय बरोबर? 'हा' फॉर्म्युला ठेवा लक्षात?

5. Personal Finance तुम्हाला मिळतील 4 कोटी, फक्त SNP हा प्लॅन ठेवा लक्षात.. हाती येईल प्रचंड पैसा!

6. Personal Finance: FD पेक्षा जास्त मिळतील पैसे, 'ही' जबरदस्त योजना तुम्हाला माहिती आहे का?

7. Personal Finance: जर तुम्हाला घरबसल्या PF चे पैसे हवे तर फक्त 'एवढंच' करा.., थेट तुमच्या खात्यात पैसे

8. गुड न्यूज: तुमचा घराचा हप्ता होणार कमी, EMI भरताना 'एवढे' पैसे वाचणार!

9. Personal Finance: शेअर मार्केटचा बाजारच उठला, आता करावं तरी काय?

10. Personal Finance: ATM वापरलं की, तुमचे पैसे कापले जाणार, 1 मे पासून येणार नियम पाहून ठेवा बरं!

11. Personal Finance: 50,000 रुपये पगार असलेली लोकंही बनू शकतात करोडपती, फक्त 300...

12. Personal Finance: EPFO कडून मोठा दिलासा, PF मधून काढता येणार 5 लाख... तेही थेट UPI आणि ATM वापरून!

13. Personal Finance: 500 रुपयांच्या मासिक SIP ने किती दिवसांत होऊ शकता कोट्यधीश? संपूर्ण गणित घ्या समजून

14. SIP सारखी जबरदस्त कमाई आणि FD सारखे दर महिन्याला पैसे, SWP प्लॅन नेमका काय?

15. Personal Finance: गुंतवणुकीवर किती पैसे मिळणार हे सत्य कोणीही सांगत नाही, 70 चा फॉर्म्युला तुम्हाला टाकेल हादरवून!

16. Personal Finance: LIC ची रक्कम किती असावी? 'हा' फॉर्म्युला खूप फायदेशीर

हे वाचलं का?

    follow whatsapp