Mumbai Tak /बातम्या / Amravati : आंबे तोडणं पडलं महागात; लोखंडी रॉड शरीराच्या आरपार
बातम्या शहर-खबरबात

Amravati : आंबे तोडणं पडलं महागात; लोखंडी रॉड शरीराच्या आरपार

Amravati News :

अमरावती : आंबे तोडायला झाडावर चढणं एक १४ वर्षीय मुलाला चांगलचं महागात पडलं आहे. आंबे तोडताना झाडावरुन तोल सुटून खाली पडल्याने संबंधित मुलाच्या शरीरातून २ फूट लोखंडी अँगल आरपार गेला. अमरावतीमध्ये (Amravati) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यश दुर्योधन असं या मुलाचं नावं आहे. उपस्थितांनी यशला तात्काळ उपचारासाठी दाखल करुन त्याचा जीव वाचविला. (A shocking incident happened with a boy who climbed a tree to cut mangoes in Amravati)

नेमका काय प्रकार घडला?

अमरावतीच्या राजापेठ भागातील गोपाळ नगरमध्ये ‘यश दुर्योधन’ हा मुलगा आंबे तोडण्यासाठी झाडावर चढला होता. यावेळी अचानक त्याचा तोल सुटून तो खाली पडला. जिथून तो पडला तिथे एका लोखंडी अँगलला वायरचे कंपाऊंड होते, त्याच लोखंडी अँगलवर तो पडला. यावेळी त्याच्या उजव्या हातातून अडीच फुटाचा लोखंडी अँगल आरपार गेला.

Thane Crime: CM एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेच्या नेत्याची हत्या

घडलेली घटना अत्यंत वेदनादायक होती. जखमी झालेल्या यश बराच वेळ वेदनेनं ओरडत होता. अशातच येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनी यशचा आवाज ऐकून लगेच त्याच्या मदतीला सुरुवात केली. उपस्थितांनी जवळच्या वेल्डिंग मशिन धारकाला फोन करून बोलावून घेत अँगल कापला आणि त्याला तात्काळ अमरावतीच्या इर्विन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

Crime : पोलिसांच्या खुर्चीवर बसून केला व्हीडिओ; रीलस्टारला घडवली जन्माची अद्दल

यशला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याची परिस्थिती पाहून उपस्थित डॉक्टरांनाही धक्का बसला होता. पण डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरु करत अवघ्या ७ मिनिटांत यशच्या हातातून शस्त्रक्रियेने अँगल काढला. तोपर्यंत तो बराच वेळ हा त्रास सहन करत होता. दरम्यान, आता त्याची तब्येत ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

बाबाची एकच चर्चा!गरम तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद Palak Tiwari: पलक तिवारीच्या बोल्ड लुकची एकच चर्चा प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या इजिप्तमधल्या गर्लफ्रेंडसोबत सीक्रेट वेडिंग, आता अभिनेता बनला पिता…. IPL five new rules : आता आणखी मजा येणार, पाच नवे नियम आयपीएलचा गेम बदलणार mumbai local mega block today : मुंबईकरांनो, सुट्टीचा प्लान आहे, मग लोकलचे वेळापत्रक जाणून घ्या प्रियकराला विष दिलं नंतर फोनवर म्हणाली, ‘मेला नाहीस तर गळफास घे’ Health Tips: ‘या’ आजारांमध्ये लसूण खाणं ठरू शकतं खतरनाक Janhvi Kapoor: जान्हवीची ग्लॅमरस बोल्ड अदा, पण झाली ट्रोल; यूजर्स म्हणाले प्लॅास्टिक… बागेश्वर बाबासोबत ‘ही’ तरूणी अडकणार लग्नबंधनात? जेव्हा चालू लेक्चरमध्ये विद्यार्थ्याने चक्क बनवला मसाला डोसा, प्राध्यापकही झाले हैराण Kapil Sharma च्या ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडचा हॉट आणि बोल्ड लूक IPL ची पहिली मॅच केव्हा झालेली? सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण? रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार?