विवाहित घर मालकिणीसोबत राहुलचे अनैतिक संबंध, 'या' बाईने केलंय डोकं हलवून टाकणारं काम!

मुंबई तक

अलीगढमधील लोधा पोलीस स्टेशन परिसरातील भाडेकरू आणि घरमालकीणीच्या प्रेमसंबंधाची चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाडेकरूच्या प्रेमात पडलेल्या घरमालकीणीने प्रियकरासोबत मिळून मोठा कांड केल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

विवाहित घर मालकिणीसोबत राहुलचे अनैतिक संबंध
विवाहित घर मालकिणीसोबत राहुलचे अनैतिक संबंध (फोटो सौजन्य: Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाडेकरूसोबत घरमालकिणीचे अनैतिक संबंध

point

भाडेकरूच्या प्रेमात वेडी झालेल्या घरमालकिणीने केलं भलतंच!

Aligarh News: अलीगढमधील लोधा पोलीस स्टेशन परिसरातील भाडेकरू आणि घरमालकीणीच्या प्रेमसंबंधाची चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाडेकरूच्या प्रेमात पडलेल्या घरमालकीणीने प्रियकरासोबत मिळून मोठा कांड केल्याचं समोर आलं आहे. खरंतर, राहुल आपली पत्नी आणि मुलांसोबत भाड्याच्या घरात राहत होता. घराच्या मालकाचं नाव शिवकुमार असून तो आपल्या कुटुंबासोबत वरच्या मजल्यावर राहत होता. मालकाच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि 11 महिन्यांची लहान मुलगी होती.

दोघांमध्ये संबंध बनले

मिळालेल्या माहितीनुसार, घर मालकाची पत्नी आणि विवाहित भाडेकरू राहुल यांच्या मते, बोलणं सुरू झालं. हळूहळू बोलणं वाढत गेलं आणि त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले आणि त्यांच्यात संबंध बनले. 

एकमेकांसोबत पळून गेले 

27 जून रोजी राहुल आणि घराची मालकीण आपल्या कुटुंबियांना सोडून एकमेकांसोबत पळून गेले. त्यांच्या नातेवाईकांना दोघांच्याही प्रेमसंबंधाची माहिती मिळताच ते हादरून गेले. तसेच राहुल आणि घर मालकीण एकमेकांसोबत पळून गेल्याची माहिती कळताच सगळ्यांना मोठा धक्का बसला. 

हे ही वाचा: "आई लवकरच जेवायला येतो", शेवटचा फोन अन् J. J. हॉस्पिटलच्या डॉक्टरने अटल सेतूवरून मारली समुद्रात उडी..

आईच्या आठवणीत मुलीचा मृत्यू

घरमालकीण तिच्या 11 महिन्यांच्या मुलीला घरी सोडून तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. अनैतिक संबंधांच्या जाळ्यात अडकलेल्या आणि भाडेकरूच्या प्रेमात वेडी झालेल्या या महिलेने तिच्या निष्पाप मुलीचाही विचार केला नाही. ती 11 महिन्यांची लहान मुलगी सतत आपल्या आईच्या आठवणीत रडत राहिली. तिच्या नातेवाईकांनी त्या मुलीला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. पण आई जवळ नसल्यामुळे मुलगी सतत रडत राहिली आणि आईच्या आठवणीत 12 दिवसांतच त्या निरागस मुलीचा मृत्यू झाला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp