पालकमंत्रीपदाचा पेच! अजित पवारांना हवेत 'हे' 3 जिल्हे, पण शिंदेंचा विरोध - ajit pawar wants 3 districts guardian minister pune satara raigad shinde not ready - MumbaiTAK
बातम्या शहर-खबरबात

पालकमंत्रीपदाचा पेच! अजित पवारांना हवेत ‘हे’ 3 जिल्हे, पण शिंदेंचा विरोध

अजित पवारांनी पुणे, रायगड आणि सातारा या तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावर दावा केला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी सातारा आणि रायगडचे पालकमंत्रीपद अजित पवार गटाला देण्यास विरोध केला आहे.
Updated At: Oct 02, 2023 10:07 AM
a meeting held at cm residence varsha. eknath shinde, devendra fadanvis and ajit pawar Discussion on Cabinet expansion and guardian ministers.

Maharashtra Politics Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी (30 सप्टेंबर) बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री वाटपाबद्दल चर्चा झाली. पण, अजित पवारांनी केलेल्या मागणीमुळे नवा पेच निर्माण झाला आहे. अजित पवारांना जे तीन जिल्हे हवेत आहेत, त्यापैकी दोन जिल्हे शिंदेंच्या मंत्र्यांकडे आहेत. तर एक जिल्ह्याचा पालकमंत्री भाजपचा आहे.

30 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर शिंदे, फडणवीस आणि पवारांची बैठक झाली. या बैठकीत काही मुद्द्यांवर चर्चा झाली. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. यात दोन मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

पालकमंत्रीपदासाठी शिंदे-पवारांमध्ये रस्सीखेच

मिळालेल्या माहितीनुसार बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री पदाच्या वाटपाबाबत चर्चा झाली. पालकमंत्रीपद वाटपासंदर्भात तिन्ही पक्षांना समसमान जिल्हे देण्याच्या फॉर्म्युला ठरवला गेला. पण, अजित पवारांनी केलेल्या मागणीने पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा >> ठाकरेंनी वाघ नखाचा मुद्दा तापवला, शरद पवारांनी विरोधाची धारच काढली, म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदं मागितली आहेत. पुणे, सातारा आणि रायगड या तीन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला (अजित पवार गट) देण्याची मागणी अजित पवारांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यासाठी तयार नाहीत. सातारा आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदं शिवसेनेकडे आहेत.

पुण्याच्या पालकमंत्रीपदाचे काय?

सध्या भाजपचे चंद्रकांत पाटील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्या जिल्ह्याच्या प्रशासनातील हस्तक्षेप वाढल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांना हवे आहे. मात्र, यावर भाजप काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं आहे.

हेही वाचा >> अजित पवार-छगन भुजबळांमध्ये शिंदेंसमोरच ‘जुपंली’; ‘त्या’ बैठकीत काय घडलं?

आमदार अपात्रता प्रकरणावर चर्चा

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही नेत्यांमध्ये आमदार अपात्रता प्रकरणाबद्दलही चर्चा झाली. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाच्या सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले आहे. दरम्यान, अपात्रता प्रकरण सुनावणीत कायदेशीर पेचप्रसंग उद्भवला तर काय करायचे, यासंदर्भात तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते ‘हे’ सीक्रेट डाएट! Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण… Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात चिकन खा अन् Weight Loss करा! कमी वयात IAS-IPS झालेल्या 5 तरुणांची प्रेरणादायी कहाणी स्वत:साठी फक्त 5 मिनिटे काढा अन् दिवसाची सुरूवात ‘या’ 8 योगा स्टेप्सने करा! झटपट Weight Loss करायचंय? मग ‘हे’ 8 Snacks खाऊनच बघा… ‘गाव की गोरी बनली, शहर की छोरी’; अभिनेत्रीने केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन अभिनेत्रीचा फुल ऑन फायर हॉट फिगर; कारण फॉलो करते ‘हा’ Diet Plan 162 किलोच्या IT इंजिनिअरने घटवलं 65 किलो वजन; कोणता सीक्रेट डाएट केला फॉलो? Weight Loss करताय? मग, वर्कआउटनंतर ‘हा’ डाएट करा फॉलो या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण?