Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाने का फटकारलं? - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाने का फटकारलं?
बातम्या शहर-खबरबात

Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाने का फटकारलं?

Aryan Khan case and SRK WhatsApp Chats : The bombay high court ordered sameer Wankhede not to make public the chats and other materials included in the petition.

Sameer Wankhede Latest News : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करून 25 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात न्यायालयाने दिलासा दिला. पण, हा दिलासा देताना न्यायालयाने वानखेडेंचे कान टोचले. 22 मे रोजी उच्च न्यायालयाने वानखेडे यांना अटकेपासून 8 जूनपर्यंत संरक्षण दिलं आहे. (Former zonal officer of Narcotics Control Bureau (NCB) Sameer Wankhede has got a big relief from the Bombay High Court. )

समीर वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी सीबीआयने आपल्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. 22 मे रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अभय आहुजा आणि न्यायमूर्ती एमएम साठये यांच्या खंडपीठाने सीबीआयला वानखेडे यांच्या याचिकेवर 3 जूनपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 8 जून रोजी होणार आहे.

हेही वाचा >> आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठा गौप्यस्फोट, शाहरुख खान-समीर वानखेडेंचं WhatsApp चॅट जसंच्या तसं

वानखेडेंनी शाहरूख खान सोबतच व्हॉट्स अप संभाषणही याचिकेत दिलेलं आहे. याचिकेत समाविष्ट असलेलं संभाषण आणि इतर साहित्य सार्वजनिक करू नये, असे आदेश न्यायालयाने वानखेडे यांना दिले आहेत. यासोबतच या प्रकरणाबद्दल मीडियाशी बोलायचं नाही आणि सीबीआयने बोलावलेल्या प्रत्येक वेळी हजर राहायचं. त्याचबरोबर पुराव्याशी छेडछाड करणार नाही, असं हमीपत्र वानखेडे यांना कोर्टात द्यावे लागणार आहे.

25 कोटींची वसुली केल्याचा आरोप

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्या सुटकेच्या बदल्यात वानखेडेंनी 25 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने वानखेडे यांच्यासह 5 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्याविरोधात वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सीबीआयने 20 आणि 21 मे रोजी समीर वानखेडे यांची 11 तास चौकशी केली होती. सीबीआयने त्यांना 24 मे रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.

शाहरुखसोबतचं संभाषण ‘लीक’, वानखेडेंना कोर्टाने फटकारले

सुनावणीदरम्यान, न्यायालयाने समीर वानखेडेंना त्यांच्या आणि शाहरुख खानमधील कथित व्हॉट्सअॅप चॅट लीक केल्याबद्दल फटकारले. सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, वानखेडेंनी जाणूनबुजून शाहरुख खानच्या चॅट मीडियात लीक केल्या आणि त्यामुळे प्रकरणाच्या तपासावर परिणाम होऊ शकतो. वानखेडे तपासावर प्रभाव टाकू शकतात आणि पुराव्यांशी छेडछाड करू शकतात, असा युक्तिवाद सीबीआयने केला.

‘लीक झालेले चॅट हा वानखेडे यांच्या निर्दोषतेचा पुरावा नाही’

वानखेडे यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला की, त्यांनी कोणत्याही चॅट मीडियाला लीक केल्या नाहीत, हा त्यांच्या याचिकेचा भाग आहे. कारण वानखेडे यांच्यावर बॉलिवूड स्टारच्या मुलाच्या सुटकेच्या बदल्यात खंडणीचा आरोप होता. मात्र, खुद्द शाहरुख खान वानखेडे यांना प्रामाणिक अधिकारी म्हणत आहे. यावर सीबीआयने म्हटले की, ‘या चॅट वानखेडे यांच्या निर्दोषत्वाचा पुरावा नाहीत.’

हेही वाचा >> Aryan Khan drugs case : समीर वानखेडेंचा 25 कोटी खंडणीचा डाव एका फोटोने उधळला! वाचा इनसाईड स्टोरी

सीबीआयचे वकील अॅडव्होकेट कुलदीप पाटील म्हणाले, ‘ही विनंती एका वडिलांनी केली आहे, ज्याचा तरुण मुलगा त्यांच्या ताब्यात होता. वानखेडे या गोष्टी प्रामाणिकतेचे प्रमाणपत्र म्हणून मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.’

प्रकरण काय होते

3 ऑक्टोबर 2021 रोजी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर अटक केली होती. मात्र, एनसीबीला आर्यनवर लावण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे सादर करता आले नाहीत. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनला 3 आठवड्यांनंतर जामीन मंजूर केला. 27 मे 2022 रोजी न्यायालयाने आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट दिली होती. कारण एनसीबीने एनडीपीएस कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यन खानच्या नावाचा समावेश नव्हता. आणि ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात एनसीबीला आर्यनविरुद्ध कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.

गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्… ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल! दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’ अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!