Aurangabad शहराचं नाव यापुढे छत्रपती संभाजीनगर, Osmanabad चं नावही बदललं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Changing the name of city Aurangabad and Osmanabad: नवी दिल्ली: औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर या नावाला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच उस्मानाबादचं नावही यापुढे धाराशिव असं असणार आहे. दोन्ही शहरांच्या नाव बदलण्याचा प्रस्ताव हा राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला होता. याच प्रस्तावाला अखेर आज (24 फेब्रुवारी) केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. (changing the name of city aurangabad as chhatrapati sambhajinagar and osmanabad as dharashiv proposal of the state government has been approved by the central government)

दरम्यान, याबाबतच्या निर्णयाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांची नावं बदलण्याचा ज्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे त्याचा जीआर देखील फडणवीसांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

यासोबतच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये असंही म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संभाजीनगर नामांतर : जे सोबत आले नाहीत, त्यांची वाट लागणार – इम्तियाज जलील

फक्त शहरांची नावं बदलली, जिल्ह्याचं नाव तेच राहणार!

दरम्यान, नामांतराचा जो प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे त्यात फक्त औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचंच नाव बदलण्यात आलं आहे. या दोन्ही जिल्ह्यांची नावं ही पूर्वीप्रमाणेच असणार आहे.

ADVERTISEMENT

शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरेंनी घेतलेला संभाजीनंगर, धाराशिवबद्दल निर्णय

जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर काही दिवसांनी हे स्पष्ट झालं की, ठाकरे सरकार लवकरच कोसळणार. मात्र, आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधी उद्धव ठाकरेंनी जी शेवटची मंत्रिमंडळ बैठक घेतली होती त्या मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता.

ADVERTISEMENT

मात्र, उद्धव ठाकरेंच्या सरकारने घेतलेला नामांतराचा निर्णय हा घाईघाईत होता. असं म्हणत शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा हा प्रस्ताव रद्द केला होता.

औरंगाबादचं संभाजीनगर होणारच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं…

शिंदे-फडणवीस सरकारने नामांतराचा फेरप्रस्ताव केलेला सादर

औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरांबाबत ठाकरे सरकारने घाईने निर्णय घेतले होते. 29 जूनला राज्यपालांनी बहुमत चाचणी घ्यायला सांगितलेली असताना आणि सरकार अल्पमतात असताना हे निर्णय घेतले गेले. त्यावर काही कायदेशीर बाबी निर्माण होऊ नयेत म्हणून फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश आम्ही देण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 जुलै 2022 रोजी सांगितलं होतं.

त्यावेळी एकनाथ शिंदे असं म्हणालेले की, ‘नामांतराबाबतच्या फेरप्रस्तावांना रितसर बहुमत असलेल्या सरकारने मान्यता दिली. त्यानुसार औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव, उस्माबादला धाराशिव हे नाव तर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.’ असं एकनाथ शिंदे त्यावेळी म्हणाले होते.

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला होणार फायदा?

दरम्यान, केंद्र सरकारने अचानक औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर याबाबत राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे. एकीकडे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक अटीतटीची झालेली असतानाच नामांतराचा निर्णय जाहीर झाल्याने आता या निर्णयाचा भाजपला फायदा होणार का? असा सवाल काही जण उपस्थित करत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT