2000 notes: तुमच्याकडेही आहे 2 हजारांची नोट? घाबरू नका.. फक्त ‘एवढंच’ करा

रोहित गोळे

ADVERTISEMENT

do you have 2000 rupee notes do not panic know what to do now rbi modi govt
do you have 2000 rupee notes do not panic know what to do now rbi modi govt
social share
google news

2000 notes: मुंबई: 2000 रुपयांच्या नोटा (2000 rupee notes) आता चलनात नसतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक परिपत्रक जारी करून हे स्पष्ट केलं आहे की, 2000 रुपयांच्या नोटा आता परत घेतल्या जातील. पण, सर्वसामान्यांनी याबाबत काळजी करण्याची अजिबात गरज नसल्याचेही आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. आरबीआयने क्लीन नोट धोरणांतर्गत हा निर्णय घेतला आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत परत करता येतील. त्यामुळे तुमच्याकडे 2000 च्या नोटा असतील तर घाबरू नका. पण त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागेल हे सविस्तरपणे जाणून घेऊया. (do you have 2000 rupee notes do not panic know what to do now rbi modi govt)

1. काळजी करू नका, कोणतीही अडचण येणार नाही

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही 2000 रुपयांची नोट तुम्ही तुमचं खातं असलेल्या बँकेत जमा करु शकता. यामुळे तुमच्या पैशाचे मूल्य संपणार नाही आणि तुमचे नुकसान होणार नाही. म्हणूनच हे परिपत्रक तुमच्या समोर आल्यानंतर कोणत्याही प्रकारे काळजी करण्याची गरज नाही.

2. नोटाबंदी नाही, ही नोट अजूनही चालू आहे

दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, यावेळी आरबीआयने स्पष्ट केले आहे की, 2000 रुपयांच्या नोटेबाबत नोटाबंदीचा विचार करू नका. 2000 रुपयांची ही नोट तुम्ही सध्या बाजारात चालवू शकता. हे स्पष्ट शब्दात समजून घ्या. त्यातून तुम्ही वस्तू खरेदी करू शकता. तुम्ही कोणाशीही 2000 रुपयांचा व्यवहार करू शकता. हे पूर्णपणे वैध आहेत आणि कोणीही ते घेण्यास नकार देऊ शकत नाही, परंतु केवळ 30 सप्टेंबर 2023 पर्यंत. म्हणजेच, या तारखेपूर्वी, तुम्ही या नोटा तुमच्या बँकेत परत करू शकता (जिथे तुमचे खाते आहे) किंवा तुम्ही त्या इतर कोणत्याही बँकेतून बदलून घेऊ शकता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

3. अफवा टाळा, 30 सप्टेंबरपर्यंत नोटा जमा करा

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तात्काळ बँकेत जाऊन रांगा लावू नका, कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नका. अराजकतेसारख्या कोणत्याही परिस्थितीला प्रोत्साहन देऊ नका. रुपयाचे मूल्य संपुष्टात आलेले नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. तुमच्या खिशात असलेली 2000 रुपयांची नोट अजूनही 2000 रुपयांचीच आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरने स्वाक्षरी केलेले वाक्य ‘मी धारकाला रु. 2000 देण्याचे वचन देतो’. हे वैध असेल.

हे ही वाचा >> Karnataka Election Result : भाजपला ‘या’ चुका भोवल्या, पराभवाची 6 कारणे

4. एका वेळी वीस हजार रुपये जमा करता येतील

जर तुम्हाला या 2000 रुपयांच्या नोटा जमा करायच्या असतील तर RBI ने यासाठी देखील एक योजना तयार केली आहे. तुम्ही 2000 रुपयांच्या नोटा 20 हजार रुपयांपर्यंतच्या कोणत्याही बँकेत एकाच वेळी बदलून घेऊ शकता आणि त्यांच्या किंमतीइतकी रक्कम तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता.

ADVERTISEMENT

5. 23 मे 2023 पासून नोटा जमा केल्या जातील

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 23 मे 2023 पासून कोणत्याही बँकेत 2000 रुपयांच्या नोटा एका वेळी इतर मूल्यांच्या नोटांसाठी बदलल्या जाऊ शकतात. नोट बदलण्याची मर्यादा 20,000 रुपये आहे. 2016 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट जारी केली होती. गेल्या काही महिन्यांपासून बाजारात 2000 रुपयांच्या नोटा कमी दिसत होत्या. एटीएममधून 2000 रुपयांच्या नोटाही बाहेर येत नसल्याचे लोकांनी सांगितले. या संदर्भात सरकारने संसदेत माहितीही दिली होती.

ADVERTISEMENT

6. अनुराग ठाकूर यांनी दिलेली माहिती, दोन वर्षांपासून नोटा छापल्या जात नाहीत

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या सर्व नोटा चलनातून बाद झाल्या. या चलनांऐवजी 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या होत्या. रिझर्व्ह बँकेला विश्वास होता की चलनातून बाहेर पडलेल्या नोटांच्या मूल्याची 2000 रुपयांची नोट सहजपणे भरपाई करेल.

हे ही वाचा >> RBI: देशात पुन्हा नोटाबंदी… 2 हजारांच्या नोटा बंद होणार!, मोदी सरकारचा मोठा निर्णय

2000 च्या नोटा 2017-18 या वर्षात देशात सर्वाधिक प्रचलित होत्या. यादरम्यान बाजारात 2000 च्या 33,630 लाख नोटा चलनात होत्या. त्यांची एकूण किंमत 6.72 लाख कोटी रुपये होती. 2021 मध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत माहिती दिली की, गेल्या दोन वर्षांपासून 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही.

क्लीन नोट धोरणाअंतर्गत घेतलेला निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या सर्वात मोठ्या चलनी नोटेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 2000 रुपयांची नोट लीगल टेंडर राहील, परंतु ती चलनातून बाहेर काढली जाईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करणे थांबवण्याचा सल्ला दिला आहे. रिझर्व्ह बँकेने ‘क्लीन नोट पॉलिसी’ अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करता येतील.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT