डोंबिवली हादरली, 18 वर्षाच्या दोन तरुणांची लोकल ट्रेनसमोर येऊन आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: डोंबिवलीत मागील दोन दिवसात दोन तरुणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे डोंबिवली हादरली असून सांस्कृतिक शहरात नेमकं चाललं तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

डोंबिवलीमधील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या रेल्वेकडून माहितीनुसार, निखिल श्रीकांत ओहल (वय 18 वर्ष) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या आयरेगावातील समतानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या निखिलने गुरुवारी दुपारी साडेबारा बाजण्याच्या सुमारास डोंबिवली ते कोपर रेल्वे स्टेशनसमोर धावत्या लोकल समोर येऊन आत्महत्या केली असल्याचं समजतं आहे.

मोटरमनने रेल्वे स्टेशन प्रबंधकांना सदर घटनेची माहिती दिली. स्टेशन प्रबंधकांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती वपोनी मुकेश ढगे यांनी दिली. मात्र निखिलने का आत्महत्या केली? हे अद्याप समजलेले नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या घटनेपूर्वी बुधवारी कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान एका तरुणांचा मृत्यू झाला. डोंबिवली पूर्वकडील म्हात्रे नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने कोपर ते दिवा स्थानकादरम्यान ट्रॅकवर चालत जात समोर येणाऱ्या लोकलाखाली आपला जीव दिलीा. बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

करण अर्जुन शेट्टी (वय 18 वर्ष) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. शेट्टी याचे वडिलांसोबत भाडणं झाले होते आणि याच रागातून त्याने आत्महत्या केल्याचे लोहमार्ग पोलिसांनी माहिती दिली.

ADVERTISEMENT

डोंबिवली : ट्रेन पकडताना तोल गेला, ट्रॅक खाली जाणाऱ्या महिलेला दोन जवानांनी वाचवलं

ADVERTISEMENT

डोंबिवलीतील कर्जबाजारी झालेल्या तरुण व्यावसायिकाची आत्महत्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीतील कर्जबाजारी झालेल्या एका व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनची घोषणा केली होती. परंतू या लॉकडाउनचा फटका अनेक छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांना बसला. डोंबिवलीत लॉकडाउनमुळे व्यवसाय ठप्प झाल्यामुळे एका तरुण व्यावसायिकाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं.

सुरज सोनी असं या व्यावसायिकाचं नाव असून डोंबिवली पूर्व येथे दावडी भागातील साई गॅलक्सी या इमारतीत तो आपल्या कुटुंबासोबत रहायचा. डोंबिवली स्टेशन परिसरात मोबाईल रिपेअरिंग आणि पार्ट्सची खरेदी-विक्री सूरज करायचा. यातून मिळालेल्या पैशांवर सूरजच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. परंतू लॉकडाउन सुरु झाल्यापासून सूरजचा व्यवसाय ठप्प झाला होता ज्यामुळे त्याला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं.

घरात पत्नी आणि दोन मुलांची रोजची होणारी आबाळ, संपत चालेले पैसे या गोष्टींमुळे सूरज अस्वस्थ होता. लॉकडाउनच्या दीड ते दोन वर्षाच्या काळात सूरजने कसंबसं घर चालवलं. मध्यंतरी त्याने नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला त्यामध्येही अपयश आलं होतं. नंतर सूरजची परिस्थिती इतकी खालावली की लाईट बिल भरायला पैसे नसल्यामुळे त्याच्या घरातलं वीज कनेक्शन तोडण्यात आलं होतं.

थकलेलं घरभाडं, त्यात वीजबीलाचे पैसे नसल्यामुळे तोडलेलं कनेक्शन, बेरोजगारीची कुऱ्हाड यामुळे सूरज पूर्णपणे नैराश्यात गेला होता. त्यामुले सूरजने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT