शिंदे गटाला पहिला तडा! यवतमाळ जिल्हाप्रमुखांचा राजीनामा, कारण…
मुख्यमंत्री (Chief Minister) आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंची (Eknath shinde) यवतमाळमध्ये (Yavatmal) डोकेदुखी वाढलीये. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या पक्षाला पहिला तडा गेलाय. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे यवतमाळचे जिल्हाप्रमुख गजानन बेजंकीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. इतकंच नाही तर बेजंकीवार (gajanan bejankiwar) यांनी पांढरकवडा बाजार समितीच्या […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री (Chief Minister) आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंची (Eknath shinde) यवतमाळमध्ये (Yavatmal) डोकेदुखी वाढलीये. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या पक्षाला पहिला तडा गेलाय. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे यवतमाळचे जिल्हाप्रमुख गजानन बेजंकीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. इतकंच नाही तर बेजंकीवार (gajanan bejankiwar) यांनी पांढरकवडा बाजार समितीच्या सभापतीपदाचाही राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. बेजंकीवार शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांच्या जवळचे आहे, त्यांनीच राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये. (Balasahebanchi shiv sena’s Yavatmal District Chief Gajanan Bejankiwar has resigned from his post.)
एकनाथ शिंदे बंड केल्यापासून उद्धव ठाकरेंच्या सेनेला हादरे दिले. राज्यातल्या अनेक भागातले आमदार त्यांनी आपल्याकडे वळवले. खासदारांना सोबत घेतलं. इतकंच नाही, सामाजिक आधारावरील राजकीय समीकरणंही जुळवण्याचा प्रयत्न शिंदे करत आहे. अशातच शिंदेंसमोर पेच उभा ठाकला आहे. हा राजकीय पेच उद्भवला आहे यवतमाळमध्ये.
ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रिपदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या संजय राठोडांनी शिवसेनेतल्या बंडाळी नंतर शिंदेंना साथ दिली. संजय राठोड यांचा हात धरून गजानन बेजंकीवारही शिंदे गटात सामील झाले.
नाशिकमध्ये भाजप नामानिराळी : गणित जुळवलं कोणी? फडणवीस म्हणतात…