IL and FS case : Jayant Patil ईडी कार्यालयात, कार्यकर्त्यांना म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

what is IL and FS case? Jayant patil in the ed office for inquiry
what is IL and FS case? Jayant patil in the ed office for inquiry
social share
google news

IL and FS case, Jayant Patil in ED Office : इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणात दुसरं समन्स बजावण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज (22 मे) सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबईतील कार्यालयात हजर झाले. सकाळी 10.30 वाजता जयंत पाटील निघाले, त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. चौकशीला निघण्यापूर्वी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचं आवाहनही केलं. (Jayant Patil Appeal to NCP workers before leave to ed office)

आयएल अॅण्ड एफएस अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. राज्याचे गृह आणि अर्थमंत्री राहिलेले, तसेच सातवेळा आमदार राहिलेले जयंत पाटील ईडीच्या रडारवर आले आहेत.

यापूर्वी जयंत पाटील यांना शुक्रवारी सकाळी जबाब नोंदवण्यासाठी ईडीने बोलावले होते. पण, त्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचं सांगत समन्सबाबत ईडीला पत्र लिहिले होते आणि वेळ मागून घेतली होती. त्यानुसार ईडीने जयंत पाटील यांना आठवड्याभराची मुदत वाढून दिली. त्यानंतर ईडीने पाटील यांना दुसरे समन्स बजावले. त्यानुसार आज (22 मे) ते चौकशीसाठी उपस्थित राहिले आहेत. ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातही गेले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी जयंत पाटील कार्यकर्त्यांना काय म्हणाले?

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ईडीच्या चौकशीला निघण्यापूर्वी एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

जयंत पाटील म्हणाले, “आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे.”

ADVERTISEMENT

Video >> अजित पवार यांचं मोठं विधान, ‘ भाकरी फिरवावी लागणार, आमच्यापासूनच सुरवात करणार’

“माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे कि कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे”, असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे.

ADVERTISEMENT

जयंत पाटील ज्यामुळे ईडीच्या रडारवर आलेत, ते प्रकरण काय?

ज्या प्रकरणी पाटील यांना ईडीने समन्स बजावलं आहे, ते प्रकरण आहे आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याचं. ईडीने याप्रकरणी आयएल अॅण्ड एफएसचे दोन माजी लेखापाल व त्यांचे सहाय्यक यांच्याशी संबंधित ठिकाणांवर गेल्या आठवड्यात सर्च ऑपरेशन रावबलं होतं.

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2019 मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर याप्रकरणी चौकशीला सुरुवात केली होती. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही ईडीने या प्रकरणी ऑगस्ट 2019 मध्ये चौकशी केली होती. 2005 मध्ये ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष आणि बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांनी कोहिनूर मिल क्र. 3 आणि कोहिनूर सीटीएनएलची स्थापना केली होती.

हेही वाचा >> Aryan Khan drugs case : समीर वानखेडेंचा 25 कोटी खंडणीचा डाव एका फोटोने उधळला! वाचा इनसाईड स्टोरी

राज ठाकरे तीन वर्षांतच या प्रकल्पातून बाहेर पडले होते. आयएल अॅण्ड एफएस यांनी विविध कंपन्या व संस्थांना दिलेल्या कर्ज व्यवहाराबद्दल ईडीला संशय आहे. त्याबाबत आता तपास सुरू आहे. आयएल अॅण्ड एफएस या कंपनीने 2018 मध्ये दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT