परभणीत मॉब लिंचिंग! तीन तरुणांवर तुटून पडले, एकाचा जागेवरच मृत्यू - Mumbai Tak - maharashtra parbhani mob lynching three youths attacked by mob one boy died on the spot - MumbaiTAK
बातम्या शहर-खबरबात

परभणीत मॉब लिंचिंग! तीन तरुणांवर तुटून पडले, एकाचा जागेवरच मृत्यू

परभणीमध्ये मॉब लिंचिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परभणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध अद्यापही सुरू आहे.
Updated At: Jun 19, 2023 13:56 PM
maharashtra parbhani mob lynching three youths attacked by mob one boy died on the spot

Latest news in Marathi: दिलीप माने, परभणी: परभणीमध्ये (Parbhani) मॉब लिंचिंगचं (Mob Lynching) प्रकरण समोर आले आहे. येथे जमावाने शेळ्या चोरल्याच्या संशयावरून तीन मुलांना बेदम मारहाण केली. ज्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. खरे तर हे प्रकरण परभणी तालुक्यातील उखलद गावाशी संबंधित आहे. येथे शेळ्या चोरल्याच्या संशयावरून जमावाने तीन मुलांना बेदम मारहाण केली. त्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. (maharashtra parbhani mob lynching three youths attacked by mob one boy died on the spot)

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तीन मुलांना जमावाच्या तावडीतून सोडवून थेट रुग्णालयात नेले. यावेळी उपचारादरम्यान एका मुलाचा मृत्यू झाला तर दोघांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर कारवाई करत 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर चौघांना अटक देखील केली आहे. तर इतरांचा आरोपींचा शोध सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार या मारहाणीत मृत्यू झालेल्या मुलाचं नाव किरपान सिंह सुजीतसिंह भाऊड असं आहे. किरपान सिंह आणि त्याचे दोन साथीदार हे हे उखलद गावातील निर्मनुष्य ठिकाणी संशयितरित्या फिरत होते. त्यामुळे गावकऱ्यांना ही तीनही मुलं चोर असल्याचं वाटलं आणि गावातील एका टोळक्याने त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा >> नरेंद्र मोदींचा ‘क्लास’, देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीचा अर्थ काय?

यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. यावेळी मुंबई Tak च्या प्रतिनिधीने जिल्हा पोलीस अधीक्षकांशी देखील संपर्क साधला. मात्र, त्यांनीही बोलण्यास नकार दिला.

मॉब लिंचिंगच्या घटना

दरम्यान, याआधीही महाराष्ट्रात मॉब लिंचिंगच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सांगली जिल्ह्यात चार साधूंवर मुलांना पळवून नेल्याच्या संशयावरून जमावाने हल्ला केला होता. ही घटना जत तालुक्यातील लवंगा गावात घडली होती. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होते. हे चारही साधू यूपीचे रहिवासी होते जे कर्नाटकातील विजापूर येथून पंढरपूर मंदिराकडे कारने जात होते. त्यानंतर रस्ता विचारत असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

हे ही वाचा >> Congress: ‘PM मोदी तर देवालाही समजावतील ब्रम्हांडात..’ राहुल गांधी असं का म्हणाले?

पालघरमध्ये मॉब लिंचिंगची घटनेने हादरलेला अवघा महाराष्ट्र

16 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात मॉब लिंचिंगची घटना घडली होती. ज्या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरून गेला होता. येथे दोन साधूंसह 3 जणांना मुलं पळविणारी टोळी समजून गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. यावेळी जमावाने 70 वर्षीय साधू कल्पवृक्ष गिरी आणि 35 वर्षीय साधू सुशील गिरी यांच्यासह त्यांचा चालक नीलेश तेलगडे यांची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे 250 जणांना अटक केली होती. दोन्ही साधू मुंबईहून सुरतला त्यांच्या कारने जात असताना पालघरच्या गडचिंचळे गावात जमावाने त्यांची हत्या केली होता. आता राज्य सरकार याबाबत सीबीआय चौकशी करणार आहे.

‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी!