Manoj Jarange : शिंदे सरकारला जरांगेंचा स्पष्ट ‘मेसेज’; म्हणाले “देव सुद्धा मराठ्यांना…”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maratha Reservation : manoj jarange rejects Maharashtra government request to extend date
Maratha Reservation : manoj jarange rejects Maharashtra government request to extend date
social share
google news

-इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर

Manoj Jarange Patil Maratha Reservation Antarwali Sarathi : शिंदे सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीत बैठक घेतली. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाशी संवाद करताना जरांगे पाटलांनी शिंदे सरकारला स्पष्ट मेसेज दिला. यावेळी गिरीश महाजनांनी केलेल्या विधानाचा उल्लेखही जरांगेंनी बैठकीत केला.

अंतरवाली सराटी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “आपल्याला फरक करून लढायचं आहे. तरच आपली शक्ती वाढणार आहे. समोरचा विरोध करतोय म्हणून आपण विरोध करायचा नाही. आपण ओबीसी आरक्षण कसं जाणार, हे बघायचं आहे. आठमुठं कोण आहेत? मराठे आहेत की, आरक्षणात येऊ नका म्हणणारे आहेत? आपल्याला फरक करून लढलो तर आपली शक्ती वाढणार आहे”, असे आवाहन जरांगे पाटलांनी केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ओबीसीमध्ये येऊ नका असं कसं म्हणता?

“काल गिरीश महाजन यांनी माहिती दिली. 54 लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत. मराठ्यांच्या जर 54 लाख नोंदी मिळाल्या, तर याचा अर्थ मराठा ओबीसी आरक्षणात आहे. मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात तुम्ही कसं काय येऊ नका म्हणता?”, असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.

हेही वाचा >> JSW : “ऑफिसला बोलावलं अन् बलात्कार केला”, उद्योगपती सज्जन जिंदालांवर बलात्काराचा गुन्हा

“जर मराठ्यांच्या ओबीसींच्या नोंदी सापडल्यात, तर मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. गिरीश महाजनांचं असं म्हणणं होतं की कुणबी नोंदी मिळाल्यामुळे देव सुद्धा मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळे विरोध करणारे कोण हे तुम्ही समजून घ्या”, असे जरांगे पाटील उपस्थितांना म्हणाले.

ADVERTISEMENT

“मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात तर तुम्ही ओबीसी आरक्षणात येऊ नका असं कसं म्हणता? हे म्हणतात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका. खरं जर बघितलं तर ओबीसी आरक्षणात सर्वात अगोदर मराठा आहे. दिलं नाही हा भाग वेगळा. यांना नंतर 1967 ला आरक्षण दिलं गेलं. त्याच्याआधीच्या मराठ्यांच्या नोंदी आहेत. याचा अर्थ आरक्षणात आम्ही आहोत, तुम्ही नाही. तुम्हाला नंतर शासन निर्णय करून दिलं.”

 

ADVERTISEMENT

“एससी आणि एसटी च्या आरक्षणाला धक्का लागत नाही, कारण ते आरक्षण आपण मागत नाही. म्हणजे दलित, मातंग बांधवांचं… त्यांच्यातील 40-42 जातींच्या आरक्षणाला आपल्यामुळे धक्का लागत नाही. दुसरं असं की एनटी, व्हीजेएनटीला आपल्यामुळे धक्का लागत नाही. धनगर, वंजारी बांधवांना आपल्या आरक्षणामुळे धक्का लागत नाही”, असं जरांगे पाटील या बैठकीत म्हणाले.

हेही वाचा >> “काय त्याचे लाड चाललेत…”, जरांगेंवर बाण, भुजबळांचा सरकारला इशारा

“मी गिरीश महाजनांना सांगितलं की, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या. कारण त्यावेळी तुम्ही शब्द दिला होता. त्यामुळे 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण देतील यात नाही शंका नाही. 17 तारखेला बैठक घेतली याचा अर्थ असा नाही की 24 डिसेंबरपर्यंत तुम्हाला दिलेला वेळ कमी केला. 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ तुमच्यासाठी अंतिम आहे.”

शिंदे समितीला आरक्षण द्या, पण…

“शिंदे समितीला मुदतवाढ दिली पाहिजे, हे आम्ही शिंदे सरकार विनंती करतो. पण, सरकारने असं समजू नये की, मुदतवाढ दिली म्हणजे आम्हाला वेळ वाढवून दिला का? नाही. 24 डिसेंबरपर्यंत कायदा बनवा. समितीला मुदतवाढ द्या. समितीचा आणि कायदा बनवण्याचा काहीही संबंध नाही. नोंदींच्या आधारावर कायदा बनवा आणि समितीला नोंदी शोधू द्या”, असं जरांगे पाटील यांनी सरकारला सांगितलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT