BMC Election : भाजपचं ‘मिशन 135’; आशिष शेलारांची ‘स्ट्रॅटेजी’, ‘त्या’ 20 जागांवर विशेष नजर
ऐन गणेशोत्सवात राज्यात राजकीय धुरळा जोरात उडताना दिसतोय. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानं राजकारण तापलं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आता भाजपनं मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी जोरात तयारी सुरू केलीये. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मिशन १३५ पूर्ण करण्यासाठी स्ट्रेटजी सांगितली. लालबागचा राजाचे […]
ADVERTISEMENT

ऐन गणेशोत्सवात राज्यात राजकीय धुरळा जोरात उडताना दिसतोय. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानं राजकारण तापलं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आता भाजपनं मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी जोरात तयारी सुरू केलीये. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मिशन १३५ पूर्ण करण्यासाठी स्ट्रेटजी सांगितली.
लालबागचा राजाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांच्या उपस्थित भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, आशिष शेलार यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यात मुंबईतील काही माजी नगरसेवकही उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ‘मिशन १३५’ची घोषणा केली. मुंबई महापालिकेत सध्या २२७ जागा असून, त्यापैकी १३५ जागा जिंकण्याचं उद्दिष्ट भाजपनं ठरवलं आहे.
उद्धव ठाकरेंनी धोका दिला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे : अमित शाहंचे मोठे वक्तव्य