मुंबईचा वेग पावसामुळे मंदावला, अनेक भागांत पाणी; रत्नागिरीत काजळीला पूर
मुंबई: राजधानी मुंबईमध्ये (Mumbai Rain) आणि आजूबाजूच्या परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु होता. सकाळी काही काळ पासवाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. लोकलची वाहतूक सध्या सर्व मार्गांवर सुरळीत आहे. आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या अजून अनेक भागात पाऊस […]
ADVERTISEMENT

मुंबई: राजधानी मुंबईमध्ये (Mumbai Rain) आणि आजूबाजूच्या परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु होता. सकाळी काही काळ पासवाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. लोकलची वाहतूक सध्या सर्व मार्गांवर सुरळीत आहे.
आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या अजून अनेक भागात पाऊस पोहोचलेला नाही, तर काही भागात कमी स्वरुपाचा पाऊस पडला आहे. दरम्यान मुंबईत पुढील ४ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ७ आणि ८ जुलैला मुंबईच अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे या जिल्ह्यांना हवामान खात्याच्या वतीनं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभरातली परिस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आव्हान हवामान खात्याच्या वतीनं करण्यात आलं आहे. पुढचे ४,५ दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागात अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोल्हापुरात एनडीआरएफ दाखल