वेश्या, उद्योजक आणि सत्ता.. 'महिलेच्या' मोहात सगळंच गमावलेलं, 'अशी' कहाणी जी...

मुंबई तक

Mumbai News : मुंबईत 12 जानेवारी 1925 रोजी एक धक्कादायक घटना घडली आहे. केवळ भारतानेच नसून संपूर्ण जगाचे लक्ष्य वेधून घेतले. एका अब्दुल कादिर बावला आणि मुमताज बेगम यांच्या नातेसंबंधातील आहे.

ADVERTISEMENT

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य: Grok)
प्रातिनिधिक फोटो (सौजन्य: Grok)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत शंभर वर्षांपूर्वी झालेल्या खूनाची आजही आठवण

point

अखेर सत्ता सोडावी लागली

Mumbai News : मुंबईत12 जानेवारी 1925 रोजी एक धक्कादायक घटना घडली आहे. केवळ भारतानेच नसून संपूर्ण जगाचे लक्ष्य वेधून घेतले. एका अब्दुल कादिर बावला आणि मुमताज बेगम यांच्या नातेसंबंधातील आहे. या दोघांच्या नातेसंबंधातून जे काही घडलं होतं. त्यातूनच ही भयानक घटना उघडकीस ली आहे.  

हेही वाचा : मुलगी आणि आईचे होते अनैतिक संबंध, शारीरिक संबंधासाठी चटावलेल्या दोघींनी केलं भयंकर कृत्य

शंभर वर्षांपूर्वी मुंबईत खून 

मुंबईतील मलबार हिल येथे त्याकाळी सर्वच श्रीमंत लोक राहायचे. तेव्हाच अब्दुल कादिर बावला (वय 25) आणि मुमताज बेगम हे कारमध्ये होते. त्यांच्या कारबाहेर काही लोक उभे होते. त्यापैकी अब्दुल नावाचा तरुण कापड व्यापारी होता. मुंबईतील सर्वात तरुण अधिकारी म्हणून त्याची ओळख होती. मुमताज बेगमचे (वय 22) ही एक सुंदर नर्तकी होती. काही महिन्यांपासून कापड उद्यागोत यशस्वी झालेल्या अब्दुलसोबत ती राहत होती. यापूर्वी मुमताज ही इंदूरच्या महाराजा तुकोजीराव होळकर येथील हरममध्ये वास्तव्यास होती. त्यानंतर ती मुंबईला आली होती. 

त्याकाळी भारतात दुर्मिळ गाड्या होत्या आणि फक्त श्रीमंत लोकांनाच त्या गाड्या विकत घेता येत होत्या. त्यांची गाडी मलबार हिलच्या रस्त्यावरून धावत होत्या. तेव्हा अचानकपणे दुसऱ्या एका गाडीने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केलं असता, ठोकर दिली गेली. या धडकेनंतर गाडी थांबवण्यात आली. 

सबंधित गाडीला ठोकर देणारे दुसरे तिसरे कोणीही नसून हल्लेखोर होते. त्यावेळी हल्लेखोरांनी गाडीला वेढा घातला. त्यांनी अब्दुलला शिवीगाळ केली आणि आरडाओरड केली. तिचे अपहरण करण्याचा हल्लेखोरांचा हेतू होता. त्यानंतर हल्लेखोरांपैकी एकाने अब्दुलवर गोळीबार केला. या गोळीबारात अब्दुल जागीच जखमी झाला. 

ब्रिटीश सैनिकांवर गोळीबार

तेव्हा त्याच ठिकाणी आलेल्या काही ब्रिटीश सैनिकांनी गोळीबाराचा आवाज ऐकला. त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली, त्यावेळी हल्लेखोरांनी एका शफी अहमद नावाच्या तरुणाला पकडले. पण दुसऱ्याने ब्रिटीश सैनिकांवर गोळीबार केला, त्या गोळीबारात एक जण जखमी झाला. हल्लेखोर मुमताजल पळवून नेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ब्रिटीश सैनिकांनी तिला रुग्णालयात नेले. 

दरम्यान, हा झालेला खून मुंबईमधील चर्चेचा विषय बनला आहे. वर्पमानपत्रात याला ब्रिटीशकालीन भारतातील सर्वात थरकाप उडवणाऱ्या खूनाची घटना होती.  इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियाने मुमताजचा फोटो छापण्याचे आश्वासन दिले आणि पोलिसांनी दैनिक बुलेटिन नावाचं वृत्तपत्र जारी करण्याची योजना आखली होती. या प्रकरणालाच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला होता. याच घटनेवर बॉलिवूडने या सत्य घटनेवर एक मूकपट बनवला होता. 

या प्रकरणात शफी अहमदच्या जबाबाने पोलिसांनी इंदूरमधून सात जणांना अटक केली होती. संबंधित तपासातून समोर आलं होते की, हे लोक इंदूर राज्याशीच संबंधित आहे. या प्रकरणात मुमताजने न्यायालायात सांगितले की, महाराजांनी तिला इंदूरमधील एका ठिकाणी ठेवले होते, तिच्या कुटुंबातील सदस्यांना तिच्याशी भेटू दिलं गेलं नव्हतं आणि तिच्या हालचालीवर बारकाईने लक्ष दिले गेले जात होते. तिने एका लहान बाळाला जन्म दिला, परंतु ती मरण पावली. तिच्या मुलांनी पारिचारीक आणि डॉक्टरांना जबाबदार धरलं आहे. 

यानंतर मुमताज ही अमृतसरला गेली पण तिथे तिची आई राहत होती. पण तिच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. महाराजांनी पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न केला, पण मुमताजने नकार दिला आणि ती मुंबईला गेली. त्यावेळी मुमताज आणि अब्दुल राहू लागला. इंदूर राज्यातील लोक मुमताजला आणि अब्दुलला पाठवण्याची धमकी देत राहिले, अन्यथा त्याचे परिणाम भयानक होतील. अब्दुलने या धमक्यांकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर ही हत्या झाली. 

हे प्रकरण त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले, जिथे देशातील सर्वोच्च वकील या प्रकरणात सामील झाले. त्यापैकी मोहम्मद अली जिना होते, ते नंतर पाकिस्तानचे संस्थापक बनले. जिना यांनी इंदूर सैन्याचे जनरल आनंदरावर गंगाराम फणसे यांचा बचाव केला आणि त्यांना मृत्युदंडापासून वाचवले. न्यायालयाने तीन जणांना मृत्यूदंड आणि तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 

दरम्यान, या प्रकरणात ब्रिटीश सरकारसाठी हा खटला कठीणच झाला होता. इंदूर हे एक शक्तीशाली संस्थान होते आणि ब्रिटीश सरकारसोबत इंदूर सरकारचे चांगले संबंध होते. 

हेही वाचा : Pune: दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, नंतर दुकानात तरूणावर कोयत्याने सपासप वार, धक्कादायक कारण आलं समोर

अखेर सिंहासनाचा त्याग

अशातच मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त पॅट्रिक केली म्हणाले की, मोहम्मदच्या खुनाचा कट हा इंदूरमध्येच रचण्यात आला होता. अखेर ब्रिटीश सरकारने आरोपी महाराजाला सांगितलं की, चौकशीसाठी ये किंवा सिंहासनाचा त्याग कर. तेव्हा महाराजांनी सिंहासनाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp