भाजपचा पुण्याचा चेहरा हरपला, गिरीश बापटांची प्राणज्योत मालवली - Mumbai Tak - pune bjp mp girish bapat admitted in icu at deenanath mangeshkar hospital pune he is on life support treatment - MumbaiTAK
बातम्या शहर-खबरबात

भाजपचा पुण्याचा चेहरा हरपला, गिरीश बापटांची प्राणज्योत मालवली

Girish Bapat Pass away: भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं आज (29 मार्च) प्रदीर्घ आजाराने पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये निधन झालं. आज प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
BJP Pune MP Girish Bapat admitted to hospital

Girish Bapat Passed away: पुणे: पुण्याचे (Pune) भाजपचे खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) यांचं निधन झालं आहे. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) उपचार सुरू होते. गेल्या अनेक दिवसांपासून गिरीश बापट यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, आज (29 मार्च) त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. निधनसमयी त्यांचं वय 72 वर्ष होतं. (pune bjp mp girish bapat admitted in icu at deenanath mangeshkar hospital pune he is on life support treatment)

थोड्या वेळेपूर्वीच दिनानाथ रुग्णालयाकडून गिरीश बापट यांच्या प्रकृतीबाबत हेल्थ बुलेटीन जारी करण्यात आलं होतं. यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर (Life Support Treatment) ठेवण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र, काही वेळापूर्वीच गिरीश बापट यांचं निधन झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा- Girish Bapat: नगरसेवक ते पुण्यातील भाजपचा चेहरा, असा आहे गिरीश बापटांचा राजकीय प्रवास

कसबा पोटनिवडणुकीमुळे चर्चेत आलेले गिरीश बापट

गिरीश बापट यांची प्रकृती ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड खालवत आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत ते अधिक चर्चेत आले होते. कारण प्रकृती ठीक नसतानाही गिरीश बापट यांना भाजपने प्रचारात उतरवल्याचं पाहायला मिळालं होतं. नाकात ऑक्सिजन नळी लावून गिरीश बापट यांना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आणण्यात आलं होतं. जिथे त्यांना शब्द उच्चारणंही कठीण जात होतं. ज्यावरून भाजप नेत्यांवर बरीच टीका देखील झाली होती. मात्र, भाजपकडून त्यावेळी असा खुलासा करण्यात आला होता की, कसबा पेठ हा गिरीश बापटांचा पारंपारिक मतदारसंघ असल्याने त्यांनीच कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली होती. म्हणून त्यांना आणण्यात आलं होतं.

मात्र, स्वत: गिरीश बापट यांना प्रचारात उतरवल्यानंतरही कसबा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा मोठ्या मताधिक्याने पोटनिवडणुकीत पराभव केला होता.

नगरसेवक ते कॅबिनेट मंत्री

खरं तर, 3 सप्टेंबर 1950 रोजी जन्मलेले गिरीश बापट हे 17व्या लोकसभेचे सदस्य होते. गिरीश बापट यांची राजकीय कारकीर्द नगरसेवक पदापासून सुरु झाली होती. त्यानंतर आमदार, कॅबिनेट मंत्री आणि खासदार असा त्यांचा कायमच चढता आलेख राहिला. 2019 ची लोकसभा निवडणूक त्यांनी पुण्यातून भाजपच्या तिकिटावर लढवली होती. पण त्यापूर्वी म्हणजे 2014 च्या फडणवीस सरकारमध्ये ते अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कामकाज या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते.

अधिक वाचा- क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यातून बेपत्ता, शोधाशोध सुरु

मात्र, 2019 लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून गिरीश बापट यांनी निवडणूक लढवावी असा आदेश त्यांना पक्षाकडून देण्यात आला होता. त्यानुसार विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचं तिकीट कापून गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत गिरीश बापट यांनी देखील सहजपणे विजय मिळवून पहिल्यांदाच लोकसभेत प्रवेश केला होता.

कसबा पेठ मतदारसंघातून बापट पाच वेळा आमदार

गिरीश बापट यांची कसबा पेठ मतदारसंघावर जबरदस्त पकड होती. कारण 1995 पासून गिरीश बापट हे सलग पाच निवडणुकांत कसबा पेठ मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. पण गिरीश बापट हे लोकसभेवर निवडून गेल्यावर त्या जागी मुक्ता टिळक यांना भाजपने विधानसभेचं तिकीट दिलं होतं. 2019 विधानसभा निवडणुकीत त्या मोठ्या मताधिक्याने कसबा पेठमधून निवडून आल्या होत्या. मुक्ता टिळक यांच्या विजयामध्ये गिरीश बापट यांचा वाटा फार मोठा.

अधिक वाचा- H3N2, H1N1 अन् कोरोना: एकाचवेळी 3 रोगांचा धोका… जाणून घ्या फरक, लक्षणं, उपचार

मात्र, काही महिन्यांपूर्वीच दुर्धर आजाराने मुक्ता टिळक यांचं निधन झालं. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. जिथे 25 वर्षात पहिल्यांदाच भाजपला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. असं असताना आता गिरीश बापट यांच्या निधनाने भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

झोप येत नसेल तर हे करुन बघा, 60 सेकंदात झोप येईल लग्न नकोच! ‘या’ मराठी अभिनेत्री घटस्फोटानंतर सिंगल लाइफ करतायेत एन्जॉय Amitabh love story : पुण्यात बघितलं अन् पहिल्या नजरेतच खेळ खल्लास! ODI 2023: न्यूझीलंडला मोठा झटका, ओपनिंग सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर! iPhone 15 Pro ला 40 हजारात खरेदी करण्याची संधी! फक्त हे करा… Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला ‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी…