पत्नीवर अनैतिक संबंधाचे आरोप, तरुणीसह दरीत उडी मारलेल्या तलाठ्याने शेवटच्या पत्रात उडवून दिली खळबळ

मुंबई तक

Pune Crime : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात दुर्गावडी येथील कोकणकडा परिसरात सुमारे 1200 फूट खोल दरीत दोन मृतदेह आढळले. त्याचसोबत त्यांच्या सुसाईड नोटही सापडल्या आहेत. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

pune crime
pune crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जुन्नर तालुक्यात दुर्गावडी येथील कोकणकडा परिसरात आत्महत्या

point

सुसाईड नोट आली समोर

Pune Crime : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात दुर्गावडी येथील कोकणकडा परिसरात सुमारे 1200 फूट खोल दरीत दोन मृतदेह आढळले. या घटनेच्या प्राथमिक तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र पारधी आणि जुन्नर येथील महाविद्यालयाची विद्यार्थीनी रुपाली खुटाण यांचाच मृतदेह असल्याची माहिती समोर आली. या दोघांनीही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाहीतर त्यांनी लिहिलेल्या सुसाईडनोटमध्ये आत्महत्येचं कारण नमूद केलं आहे. 

हेही वाचा : मुलाला पाठवले आईचे अश्लील Video, नंतर महिलेच्या मैत्रिणींनाही दाखवलं; अन्...

दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांनी दोघे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. घटनास्थळी दोघांच्या वेगवेगळ्या सुसाईड नोटही सापडल्या आहेत. त्यात त्यांनी आत्महत्येचं कारण नमूद केलं आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर पोलीस आणि रेस्कू पथकाने दोघांचे मृतदेह खोल दरीतून बाहेर काढले आहेत. रामचंद्र पारधी यांचे मूळ गाव हे दुर्गावाडी होते. तर श्रीगोंदा येथे ते तलाठी म्हणून कार्यरत होते. आपला पती बेपत्ता झाल्याची पत्नीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

तर दुसरीकडे रुपाली खटाण देखील बेपत्ता होती. त्यामुळे जुन्नर पोलीस ठाण्यात तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जुन्नर येथील घटनास्थळी काही दिवसांपासून पांढऱ्या रंगाची कार उभी होती. स्थानिकांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर तपास सुरू केला. यावेळी त्यांना कारजवळ त्यांच्या चप्पला आढळल्या. दोन दिवस रेस्कू पथकाने दरीजवळील परिसरात शोध सुरू ठेवला. त्यानंतर रेस्कू पथक हे दरीत उतरले. त्यावेळी पथकाला रुपाली आणि रामंचंद्रचा मृतदेह आढळून आला होता. त्चा ठिकाणी दोघांच्या सुसाईडनोट आढळून आलेल्या होत्या. 

नेमकं काय होतं सुसाईड नोटमध्ये? 

रामचंद्र पारधी यांच्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं होतं की, "मी रामचंद्र साहेबराव पारधी आपल्या आई-वडिल आणि भावाची माफी मागतो. माझी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी माला मानसिक त्रास दिला आहे. पत्नी आणि तिच्या नातेवाईकांविरोधात कारवाई करावी.  पत्नीचे गावातल्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. तिनं कधीच मानसिक आणि शारीरिक सुख दिलं नाही.", असा खळबळजनक आरोपच त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. 

हेही वाचा : दारूसाठी पैसे देण्यास पत्नीचा नकार, नवऱ्याची सटकली अन् लहान लेकरांसमोर गळा दाबत...थरकाप उडवणारी घटना

रुपाली खुटाण सुसाईड नोट

तर रुपाली खुटाण हिने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात लिहिलं होतं की, "मी माझ्या आई वडिलांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे". दोघांनीही कुटुंबियांना दोष देत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. 


हे वाचलं का?

    follow whatsapp