'रील स्टार' महिला पोलीस बनल्या खंडणीखोर, प्राचार्याला ब्लॅकमेल करून लाखो उकळले; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा
Pune Crime News : पुण्यातील एका महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करुन 7 लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे या प्रकरणात कायद्याचे रक्षकचं भक्षक बनले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'रील स्टार' महिला पोलीस बनल्या खंडणीखोर
प्राचार्याला ब्लॅकमेल करून लाखो उकळले; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा
Pune Crime News : पुणे शहरातील पोलीस दलालाच भ्रष्ट कारभार समोर आणणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करत तब्बल 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : Surya Gochar 2026 : सूर्य करणार उच्च राशीत प्रवेश, भाग्य उजळणार की अडचणी वाढणार? काय सांगते तुमची रास?
महिला प्राचार्याला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्याची भीती दाखवली
या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील कर्मचारी तसेच सोशल मीडियावर ‘रील स्टार’ म्हणून ओळखली जाणारी सोनाली हिंगे यांचा समावेश आहे. आरोपींनी संबंधित महिला प्राचार्याला पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवत पैशांची मागणी केली होती. भीतीपोटी पीडित महिलेकडून तब्बल 7 लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी पोलीस हे शाळेत गुड टच बॅड टच प्रशिक्षण द्याला जात होते, या दरम्यान पीडित महिलेला हेरून कट रचून हा सगळा प्रकार केला आहे.
हेही वाचा : बांधकाम सुरु असलेल्या खोलीत 13 वर्षीय मुलीचे हात-पाय बांधले, पाच जणांनी मिळून पीडितेची अंधारात अब्रू लुटली









