डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज काढणाऱ्या विद्यानंद बापटांना मारहाण, काय घडलं? VIDEO
Vidyanand Bapat : डीजेविरोधात भूमिका घेतल्यानंतर चर्चेत आलेले विद्यानंद बापटांना पुण्यातील टिळक रोडवरील कशाळे चौकात मारहाण करण्यात आली. काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज काढणाऱ्या विद्यानंद बापटांना मारहाण
पुण्यातील टिळक रोडवरील कशाळे चौकात बेदम मारहाण
Vidyanand Bapat : गणेशोत्सवात डीजेला विरोधाची भूमिका घेतल्यानंतर अल्पावधीतच चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांना पुण्यातील टिळक रोडवरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे. काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज काढल्यामुळे विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा : अनुष्का-विराट लंडनला का झाले शिफ्ट? मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पतीने आता सांगितलं खरं कारण!
गणेश मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले, अन् थेट मारहाण
काही दिवसांपूर्वी पुण्यात गणेशोत्सव कसा असावा? याबाबत पुणे महानगरपालिकेच्या वतीने बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीदरम्यान विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवात डीजे नको, अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या भूमिकेवर गणेश मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून गेल्यानंतर सुरक्षारक्षकांनी संबंधित नागरिकाला बाहेर काढले होते.
हेही वाचा : Maharashtra Weather : येरे येरे पावसा, काही जिल्ह्यांना पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्टचा अंदाज
