बच्चू कडू-रवी राणांचा वाद मिटणार?, राणा शिंदेंच्या भेटीसाठी मुंबईत, पडद्यामागं काय घडलं?

मुंबई तक

आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातला वाद शिगेला गेल्यानंतर आणि बच्चू कडूंनी इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू झालेत. गेल्या दोन दिवसात पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या असून, रवी राणांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावलं होतं. आज राणा शिंदे आणि फडणवीसांची भेट घेणार आहेत. बडनेराचे आमदार रवी राणा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातला वाद शिगेला गेल्यानंतर आणि बच्चू कडूंनी इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू झालेत. गेल्या दोन दिवसात पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या असून, रवी राणांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावलं होतं. आज राणा शिंदे आणि फडणवीसांची भेट घेणार आहेत.

बडनेराचे आमदार रवी राणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सकाळीच नागपूर विमानतळावरून मुंबईकडे रवाना झाले. मुंबई रवी राणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलं. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही रवी राणा भेट घेणार असल्याची माहिती आहे.

“राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही माझे नेते आहेत. त्यांनी मला बोलविल्यामुळे मी आज मुंबई जात आहे”, रवी राणांनी नागपूरहून मुंबईला रवाना होण्यापूर्वी सांगितलं. शिंदे-फडणवीसांनी यात मध्यस्थी केल्यानं बच्चू कडू-रवी राणा वाद मिटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बच्चू कडू-रवी राणा वाद : एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, प्रविण दरेकरांचे फोन… काय घडलं?

बच्चू कडूंनी २८ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेत रवी राणांना पुरावे देण्याचं आव्हान दिलं. इतकंच नाही, तर एकनाथ शिंदेंनी यावर स्पष्टीकरण द्यावं अन्यथा वेगळा विचार करू, असा इशारा दिला.

हे वाचलं का?

    follow whatsapp