Rushikesh Bedre : “पवार साहेब, कट नेमका कुणी रचला?” राणेंनी दाखवला फोटो, NCP ने घेरले
rushikesh bedre photo with sharad pawar : अंतरवाली सराटीतील पोलिसांवर झालेल्या दगडफेकीतील आरोपी ऋषिकेश बेदरे याला अटक करण्यात आली. त्याचा शरद पवारांसोबतचा फोटो शेअर करत आमदार नितेश राणेंनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
ADVERTISEMENT

Nitesh Rane On Rushikesh Bedre News : मनोज जरांगेंच्या उपोषणावेळी दगडफेकीची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या गेवराई तालुका अध्यक्षाला अटक केली आहे. ऋषिकेश बेदरे असं त्याचं नाव असून, यावरून राजकारण पेटलं आहे. आमदार नितेश राणेंनी एक फोटो पोस्ट करत थेट शरद पवारांनाच सवाल केला. यावर राजेश टोपेंनी खुलासा केला आहे. पण, या अटकेमुळे ऐन थंडीत राजकारण तापलं आहे. (Nitesh Rane hits out at NCP Supremo sharad pawar after rushikesh bedre arrested)
मनोज जरांगेंचं अंतरवाली सराटीत उपोषण सुरू असताना पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेला पोलिसांनी अटक केली. ऋषिकेश बेदरेच्या अटकेने राज्यात राजकीय वार-प्रतिवार सुरू झाले आहेत.
नितेश राणेंनी पोस्ट केला शरद पवारांसोबतचा फोटो
बेदरेला अटक केल्यानंतर तो राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचे समोर आले. त्याच्या सोशल मीडिया हॅण्डलवर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, असा उल्लेख आहे. दरम्यान, बेदरेचा शरद पवार आणि राजेश टोपेंसोबतचा एक फोटो आमदार नितेश राणेंनी पोस्ट केला.
हा पोस्ट करत नितेश राणेंनी पवारांना प्रश्न केला. “दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? अंतरवाली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. 1 सप्टेंबर पोलिसांवर दगडफेक, तर 3 सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?”, असं म्हणत राणेंनी पवारांच्या दिशेने बोट केले.
हेही वाचा >> महायुतीचा फॉर्म्युला ठरला! फडणवीसांनी सांगितलं शिंदे-पवारांना किती जागा?
दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात?
अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली.
पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण… pic.twitter.com/Nti9p7ortQ— nitesh rane (@NiteshNRane) November 26, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांना सवाल
नितेश राणेंच्या या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दोन फोटो प्रसिद्ध केले. ही पोस्ट लवांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग केलीये. ते म्हणतात की, “ऋषिकेश बेदरे हा कुणाचा कार्यकर्ता आहे, हे गेवराई तालुक्यात व बीड जिल्ह्यात सर्वांना माहिती आहे. हा अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब आपण फोटोतील नेत्यांना ओळखता ना?”, असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लवांडे यांनी केला आहे.
हेही वाचा >> “अजित पवारांचे पक्षासाठी योगदान नाही, असे मी…”, जितेंद्र आव्हाडांनी केला खुलासा
ऋषिकेश बेदरे हा कुणाचा कार्यकर्ता आहे हे गेवराई तालुक्यात व बीड जिल्ह्यात सर्वांना माहिती आहे. हा मा. @AjitPawarSpeaks यांचे गटाचा कार्यकर्ता आहे.
मा.@mieknathshinde
मा.@Dev_Fadnavis साहेब आपण फोटोतील नेत्यांना ओळखता ना ? @abpmajhatv@TV9Marathi @BJP4Maharashtra@mumbaitak… pic.twitter.com/0SeMlp75ef— Vikas Lawande (@VikasLawande1) November 26, 2023
राष्ट्रवादींने राणेंना दाखवला बेदरेसोबतचा फोटो
लवांडे यांनी आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो नितेश राणेंचा आहे, ज्यात त्यांच्या शेजारी उभा असलेला व्यक्ती ऋषिकेश बेदरे असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. लवांडे यांनी हा फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, “विचारशून्य युवा नेते नितेश राणे तुमच्यासोबत कोण तुमचा मित्र आहे? हे जरा गृह विभागाला सांगावे. देवेंद्र फडणवीस आपण ही जोडी ओळखता ना?”, असं म्हणत राणेंनाच घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
विचारशून्य युवा नेते @NiteshNRane तुमच्यासोबत कोण तुमचा मित्र आहे ? हे जरा गृह विभागाला सांगावे. @Dev_Fadnavis आपण ही जोडी ओळखता ना ? @NCPspeaks @RRPSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @mieknathshinde @AjitPawarSpeaks @abpmajhatv @mumbaitak @TV9Marathi… pic.twitter.com/zoWxYQbfla
— Vikas Lawande (@VikasLawande1) November 26, 2023
राजेश टोपेंनी केला खुलासा?
दरम्यान, राजेश टोपे यांनी आमदार नितेश राणे यांच्या आरोपावर खुलासा केला आहे. टोपे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “अंतरवाली सराटी प्रकरणात अटक करण्यात आलेला ऋषीकेश बेदरे हा व्यक्ती माझ्या भागातील नसून, यापूर्वी मी त्याला कधीही पाहिले नाही व ओळखतही नाही.लाठीचार्ज झाल्यानंतर पवार साहेब अंतरवाली येथे आले असता त्याप्रसंगी ऋषीकेश बेदरे या व्यक्तीने जमावात घूसून काढलेला तो फोटो आहे.”
अंतरवाली सराटी प्रकरणात अटक करण्यात आलेला ऋषीकेश बेदरे हा व्यक्ती माझ्या भागातील नसून यापूर्वी मी त्याला कधीही पाहिले नाही व ओळखतही नाही.लाठीचार्ज झाल्यानंतर पवार साहेब अंतरवाली येथे आले असता त्याप्रसंगी ऋषीकेश बेदरे या व्यक्तीने जमावात घूसून काढलेला तो फोटो आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 26, 2023
राजेश टोपेंनी पुढे म्हटलं आहे की, “या पलीकडे त्याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही व नव्हता.पोलीस प्रशासनाने यासंदर्भात त्याची पाळेमुळे व सत्यता पडताळावी व यासंदर्भात कोणीही चुकीचे संबंध जोडू नयेत”, असे म्हणत टोपेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचबरोबर शरद पवारांसोबतच्या ऋषिकेश बेदरेच्या फोटोबद्दल खुलासा केला आहे.