MBBS चे 3 विद्यार्थी सोबतच नदीत बुडून दगावले... चंद्रपूरमध्ये घडलेली घटना नेमकी काय?

मुंबई तक

काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी तीन बहिणींचा बुडून मृत्यू झाला होता. पण तरीही प्रशासनानं कोणताही इशारा फलक किंवा सुरक्षा व्यवस्था केलेली नाही.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Chandrapur News : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरच्या गावात अतिशय दुःखद दुर्घटना घडली. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होतं, पण अंधारामुळे ते थांबवण्यात आलं. आज पुन्हा शोधकार्य सुरू झालं, त्यानंतर मृतदेह सापडले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे ही वाचा >> 'पाकिस्तान ऐकायला तयार नाही हल्ला सुरूच, आता आम्ही...', Army ला थेट कारवाईचे आदेश

नदीत पोहायला उतरले आणि घात झाला...

गडचिरोलीच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थी सुट्टीच्या दिवशी पिकनिक साजरी करण्यासाठी नदीकाठावर गेले होते. वैनगंगा नदीत पोहोण्यासाठी पाण्यात उतरले असताना ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, नदीत आंघोळ करत असताना, तीन विद्यार्थी अचानक खोल पाण्यात गेले. त्यांच्यासोबतच्या मित्रांनी इतर विद्यार्थ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही.

स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना तात्काळ घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सावली पोलीस ठाण्याचे एसएचओ प्रदीप पुल्लरवार त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं.

हे ही वाचा >> "पाकिस्तानच्या मातीत दहशतवादाला...", ट्रम्प यांच्या हस्तक्षेपावरून संतप्त ओवैसींचे 4 सवाल

बुडालेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे. वर्षीय गोपाळ गणेश साखरे (रा. साखरी बुलढाणा), पार्थ बाळासाहेब जाधव (रा. शिर्डी अहमदनगर) आणि वर्षीय स्वप्नील उद्धवसिंग शायर (रा. छत्रपती संभाजीनगर) अशी या तिघांची नावं आहेत. तिघांचंही वय 20 वर्ष होतं. हे तिघेही विद्यार्थी गडचिरोलीच्या मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत होते. या अपघातानंतर संपूर्ण मेडिकल कॉलेजमध्ये शोककळा पसरली आहे. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे.

तीन बहिणीही इथेच बुडाल्या होत्या...

दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी तीन बहिणींचा बुडून मृत्यू झाला होता. पण तरीही प्रशासनानं कोणताही इशारा फलक किंवा सुरक्षा व्यवस्था केलेली नाही. स्थानिक लोकांचं म्हणणे आहे की हे ठिकाण खोल आणि धोकादायक आहे, तरीही इथे पिकनिक आणि आंघोळीसाठी येणाऱ्यांची गर्दी असते.

हे वाचलं का?

    follow whatsapp