Govt Job: भारत-पाक युद्धाची स्थिती, पण तरी तरूणांना सरकारी नोकरीची मोठी संधी.. झटपट करा अर्ज

मुंबई तक

भारताच्या सर्वात मोठ्या बँकेतील म्हणजेच स्टेट ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) च्या पदांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 9 मे 2025 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

ADVERTISEMENT

भारत-पाक युद्धाची स्थिती, पण तरी तरूणांना सरकारी नोकरीची मोठी संधी
भारत-पाक युद्धाची स्थिती, पण तरी तरूणांना सरकारी नोकरीची मोठी संधी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

SBI मध्ये 2500 हून अधिक पदांसाठी बंपर भरती

point

सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची संधी

point

सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) च्या पदांसाठी मोठी भरती

SBI Recruitment: अनेकांचे सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असते. अशी नोकरी मिळवण्यासाठी बरेच तरुण यासाठीच्या परीक्षांची तयारी करत असतात. अशा परीक्षार्थींसाठी नवीन भरतीची बातमी समोर आली आहे. भारताच्या सर्वात मोठ्या बँकेतील म्हणजेच स्टेट ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) च्या पदांसाठी  बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 9 मे 2025 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 29 मे 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात. 

'या' पदांसाठी निघाली भरती

SBI च्या नोटिफिकेशन प्रमाणे, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या एकूण 2500 हून अधिक पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पात्रता

या भरतीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यालयातून पदवीधर असणं आवश्यक आहे. विशेष बाब म्हणजे मेडिसिन, इंजिनियरिंग, चार्टड अकाउंटंसी आणि कॉस्ट अकाउंटंसी सारख्या प्रोफेशनल क्षेत्रातील पदवीधर सुद्धा भरतीसाठी अर्ज करू शकतात. 

हे ही वाचा: 10 War Survival Tips: युद्धाला सुरुवात झाली तर तुमच्याकडे 'या' 10 गोष्टी हव्याच, नाहीतर...

वयोमर्यादा

या भरतीसाठी उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2025 रोजी किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. म्हणजेच, या तारखेपर्यंत, तुमचा जन्म 1 मे 1995 ते 30 एप्रिल 2004 दरम्यान झाला पाहिजे.

कशी होईल निवड?

या भरतीसाठी निवड प्रक्रियेचे चार टप्पे असतील: ऑनलाइन लेखी परीक्षा, स्क्रीनिंग, मुलाखत आणि स्थानिक भाषेच्या ज्ञानाची चाचणी. उमेदवारांना या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी व्हावे लागेल.

हे ही वाचा: Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने सुरु केलं 'बुनयान उल मरसूस', नेमका अर्थ काय?

अर्ज करण्यासाठी शुल्क

अर्ज करण्यासाठी जनरल (Open), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवांरांना 750 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच एससी (SC), एसटी (ST) आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतेच शुल्क भरावे लागणार नाही. ही फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा ऑफलाइन पद्धतीने भरली जाऊ शकते. 

ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम SBI च्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा. 
  • होमपेजवरील 'Careers' पर्याय निवडा.
  • 'SBI CBO Recruitment 2025' या लिंकवर क्लिक करा. 
  • यानंतर रजिस्ट्रेशन करून ऑनलाइन अर्ज भरून घ्या. 
  • आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करा. शुल्क भरून फॉर्म सबमिट करा. 

 

हे वाचलं का?

    follow whatsapp