10 War Survival Tips: युद्धाला सुरुवात झाली तर तुमच्याकडे 'या' 10 गोष्टी हव्याच, नाहीतर...

मुंबई तक

सध्या, युद्धाच्या या तणावग्रस्त वातावरणात तुम्ही स्वत:ची काळजी कशी घ्याल? नेमक्या कोणत्या गोष्टी तुमच्या सोबत असायला हव्यात? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

ADVERTISEMENT

युद्धाच्या तणावात कशी घ्याल स्वत:ची काळजी?
युद्धाच्या तणावात कशी घ्याल स्वत:ची काळजी?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

युद्धाच्या तणावग्रस्त वातावरणात स्वत:ची काळजी कशी घ्याल?

point

आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचावासाठी टिप्स

point

युद्धाच्या वातावरणात 'या' वस्तू तुमच्याजवळ नक्की ठेवा

10 War Survival Tips: भारताने पाकिस्तानावर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या पाकिस्तानकडून  भारताच्या काही परिसरांमध्ये ड्रोनने हल्ले केले जात आहेत. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि पठानकोटमध्ये सकाळीच हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या दहशतवादी लाँच पॅडवरून पाकिस्तानी सैन्य ड्रोन हल्ले करत होते, ते भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले असल्याचे वृत्त समोर आलं आहे. पाकिस्तान आता सतत हल्ले करत असल्याचं दिसून येत आहे. 

ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने 8 आणि 9 मे च्या रात्री भारताच्या पश्चिम सीमेवर एकाच वेळी अनेक हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तान ड्रोन आणि इतर शस्त्रास्त्रांद्वारे भारतीय सीमांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासोबतच जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) कित्येक वेळा सीझफायरचं उल्लंघन करण्यात आलं आहे.

सध्या, युद्धाच्या या तणावग्रस्त वातावरणात तुम्ही स्वत:ची काळजी कशी घ्याल? नेमक्या कोणत्या गोष्टी तुमच्या सोबत असायला हव्यात? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. 

'या' 10 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

1. टॉर्च किंवा इमरजेंसी लाइट

सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत तुमच्याजवळ बॅटरी म्हणजेच टॉर्च, इमरजेंसी लाइट आणि मेणबत्ती असणं आवश्यक आहे. 

2. प्रथमोपचार पेटी

तुमच्यासोबत नेहमी एक फर्स्ट एड किट म्हणजेच प्रथमोपचार पेटी असणं गरजेचं आहे. यामध्ये डेटॉल, पट्ट्या, अँटीसेप्टिक क्रीम आणि पेन किलर असणं आवश्यक आहे. 

3. हायजीन (Hygiene) कीट

हायजीन कीटमध्ये एक साबण, सॅनिटरी पॅड्स, सॅनिटायझर, टॉयलेट पेपर, टिश्यू पेपर आणि पाण्याच्या स्वच्छतेसाठी क्लोरीन टॅब्लेट्स असणं आवश्यक आहे. 

4. रोख पैसे आणि आवश्यक डॉक्यूमेंट्स

तुमच्याकडे काही रोख पैसे आणि त्यासोबतच आधार कार्ड, पत्ताचा पुरावा असलेलं डॉक्यूमेंट आणि बँक डिटेल्स असणं अत्यावश्यक आहे. 

5. पावर बँक

तुमचा फोन आणि त्यासोबत चार्जर, पावर बँक नेहमी तुमच्यासोबत ठेवा. यासोबतच आपल्या पाकिटात डायरीमध्ये इमरजेंसी नंबर लिहून ठेवा. 

6. Tools

काडीपेटी म्हणजेच माचिस, कात्री, पेन-पेपर आणि सेफ्टी पिनसारख्या काही आवश्यक वस्तू तुमच्या किटमध्ये नक्की ठेवा. 

7. ब्लॅकआउटची तयारी

ब्लॅक आउटची स्थिती उद्भवल्यास तुमच्या घराच्या लाइट्स बंद ठेवण्याचा सल्ला मॉक ड्रिलमध्ये दिला गेला आहे. शक्यतो, घरातील पडदे गडद रंगाचे लावा आणि तसे नसल्यास प्रकाश बाहेर न जाण्यासाठी काळ्या चार्ट पेपरचा वापर करा. 

8. बॅटरीच्या साहाय्याने चालणारा रेडियो

बऱ्याचदा आपत्कालीन परिस्थितीमुळे वीज कापली जाते आणि इंटरनेटसुद्धा बंद करण्यात येतात. अशा परिस्थितीत, काही आवश्यक माहिती किंवा बातमीसाठी तुमच्याकडे बॅटरीच्या साहाय्याने चालणारा रेडियो ठेवू शकता. 

9. जवळील रुग्णालयाची माहिती

आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या जवळील परिसरातील रुग्णालय आणि पोलीस स्टेशनची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. 

10. आपल्या आसपासच्या लोकांची मदत करणे

कोणत्याही वाईट परिस्थितीत आपल्या आसपासच्या लोकांची मदत करणं गरजेचं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp