Govt Job: सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी! महिन्याला 1 लाख रुपये पगार अन्... कधीपर्यंत कराल अर्ज?
सुप्रीम कोर्टाकडून नुकतीच लॉ क्लर्क कम रिसर्च असोसिएट्स पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. SCI कडून www.sci.gov.in या वेबसाइटवर भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी!
महिन्याला 1 लाख रुपये पगार अन्...
काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Supreme Court Law Clerk Recruitment 2026: सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या उमेदवारांसाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सुप्रीम कोर्टाकडून नुकतीच लॉ क्लर्क कम रिसर्च असोसिएट्स पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. SCI कडून www.sci.gov.in या वेबसाइटवर भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. 20 जानेवारी 2026 पासून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इंस्टिट्यूटमधून लॉ ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. यासाठी 'बॅचलर ऑफ लॉ'ची डिग्री असणं असणं आवश्यक आहे. यासोबतच, 'बार काउन्सिल ऑफ इंडिया'मध्ये अॅडव्होकेट (वकील) म्हणून रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. तसेच, लॉ कोर्सच्या पाचव्या किंवा ग्रॅज्युएशनच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत असलेले उमेदवार सुद्धा अर्ज करण्यासाठी पात्र असतील. परंतु लॉ क्लर्क पदावर नियुक्त होण्यापूर्वी त्यांना लॉ क्वालिफिकेशनची पात्रता प्राप्त करणं आवश्यक आहे. यासोबतच, उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं अनिवार्य आहे.
हे ही वाचा: सिंधुदुर्ग: आई भाजी विकत असताना मुलगा CRPF मध्ये निवड झाल्याची बातमी घेऊन आला, ह्रदयस्पर्शी व्हिडीओ
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 20 वर्षे आणि कमाल 32 वर्षे अशी उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, 7 फेब्रुवारी 2026 तारखेच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल.
रिक्त जागा: 90 (अंदाजे)
पगार: दरमहा 1,00,000 रुपये










