जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का, राष्ट्रवादी पुरस्कृत नगरसेविकेचा महायुतीला पाठिंबा! अपक्ष म्हणून आल्या होत्या निवडून
Thane Municipal Corporation : राज्यातील महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या सगळ्या गदारोळात ठाणे महानगरपालिकेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 23 मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या पुरस्कृत उमेदवार प्रमिला मुकुंद केणी यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का
राष्ट्रवादी पुरस्कृत नगरसेविकेचा महायुतीला पाठिंबा
Thane Municipal Corporation : राज्यातील महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या सगळ्या गदारोळात ठाणे महानगरपालिकेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 23 मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या पुरस्कृत उमेदवार प्रमिला मुकुंद केणी यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. शिंदेसेनेने तिकिट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यांना पुरस्कृत केले होते.
हे ही वाचा : 'मी तुळजापूरला नवस फेडायला गेले होते..', मोबाईल बंद कशामुळे होता? सरिता म्हस्केंनी घडलेलं सगळं सांगितलं
जितेंद्र आव्हाडांना धक्का
प्रमिला मुकुंद केणी याआधी राष्ट्रवादी शरद पवार गटात होत्या. यानंतर त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला होता. मात्र शिंदेसेनेने त्यांना तिकिट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. यासाठी त्यांना शरद पवार गटाने पुरस्कृत केले होते. मात्र आता निवडून आल्यानंतर त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. कोकण भवन येथे जाऊन त्यांनी महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यानंतर राजकीय विश्वात चर्चांना उधाण आले असून जितेंद्र आव्हाड यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
ठाण्यात 'या' प्रवर्गाचा होणार महापौर
ठाणे महानगरपालिकेत जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीनुसार ठाण्याचं महापौर पद हे SC (अनुसुचित जाती प्रवर्ग - सर्वसाधारण) साठी राखीव झालं आहे. त्यामुळे SC प्रवर्गातील उमेदवार ठाण्याचा महापौर होणार आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील परिषद सभागृहात ही सोडत जाहीर करण्यात आली. 2011 च्या जनगणनेचा आधार घेऊन ही सोडत जाहीर करण्यात आली.










