उज्ज्वल निकमांचा गेम चेंजिंग युक्तीवाद, किसनराव हुंडीवाले प्रकरणात 10 जणांना जन्मठेप, भाजप नेत्याचं कुटुंब होतं सामील
अकोला येथील अत्यंत वादग्रस्त किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निकाल दिला. या खळबळजनक हत्याकांडात न्यायालयाने 10 आरोपींना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
किसनराव हुंडीवाले प्रकरणात 10 जणांना जन्मठेप
उज्ज्वल निकमांचा गेम चेंजिंग युक्तीवाद
भाजप नेत्याचं कुटुंब होतं सामील
Akola News: अकोला येथील अत्यंत वादग्रस्त किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निकाल दिला. या खळबळजनक हत्याकांडात न्यायालयाने 10 आरोपींना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आश्चर्याची बाब म्हणजे, आरोपींमध्ये भाजपाची पाहिल्या महापौरचे पती, माजी पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या मुलाचा देखील समावेश आहे.
सुमन गावंडे यांच्या कुटुंबियांचा समावेश
गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि अकोल्यातील प्रसिद्ध मालमत्ता व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांची 6 मे 2019 रोजी पोलिस अधीक्षकांच्या अधिकृत बंगल्याशेजारी असलेल्या पब्लिक ट्रस्ट सब-रजिस्ट्रार कार्यालयात दिवसाढवळ्या क्रूर हत्या करण्यात आली. या घटनेनंतर, जिल्ह्यात कायदा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. या हाय-प्रोफाइल प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये भाजपच्या पहिल्या महापौर सुमन गावंडे यांच्या कुटुंबातील पाच जणांची नावे समोर आली आहेत. तसेच, हत्येचा कट रचण्यापासून ते निर्घृण हत्या करण्यात त्यांची सक्रिय भूमिका असल्याचं न्यायालयात सिद्ध झालं.
हत्येतील मुख्य आरोपी
श्रीराम गावंडे- सुमन गावंडे यांचे पती आणि निवृत्त पोलीस निरीक्षक
विक्रम उर्फ छोटू गावंडे- सुमन गावंडे यांचा मुलगा आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष
रणजीत गावंडे
धीरज गावंडे
प्रल्हाद गावंडे
हे ही वाचा: राज ठाकरेंनी मुभा दिली म्हणूनच KDMC मध्ये महायुतीला पाठिंबा, मनसेच्या माजी आमदाराने सगळं सांगितलं
न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या 10 आरोपींमध्ये श्रीराम गावंडे, विक्रम उर्फ छोटू गावंडे, रणजित गावंडे, धीरज गावंडे, प्रल्हाद गावंडे, दिनेश राजपूत, प्रतीक तोंडे, विशाल तायडे, सतीश तायडे आणि मयूर अहिर यांचा समावेश आहे. तसेच, फारसे पुरावे नसल्यामुळे या प्रकरणाची पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम सरकारी पक्षाचे वकील होते. तसेच, या निकालावेळी या खटल्यातील विशेष सरकारी वकील खासदार उज्ज्वल निकम उपस्थित होते.










