दुकानाबाहेर महिलेच्या लेहंग्यातून पडला तुपाचा डबा, झडती घेताच 30 हजारांचं सामान... चित्रपटाला लाजवेल अशी घटना

मुंबई तक

Viral News : राजस्थानातील जोधपूरच्या चैतन्यशील शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलांची टोळी चोऱ्या करताना दिसत आहेत. चोरी करताना त्या महिला अगळीवेगळी शक्कल लढवून चोरी करताना दिसताहेत. एकाच वेळी हजारो रुपयांची चोरी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. चित्रपटाला देखील लाजवेल असा थ्रिलर चोरीतून समोर आला आहे. 

ADVERTISEMENT

Viral News
Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलांच्या लेहेंग्यांमध्ये मोठे खिसे आणि बॅग शिवल्याचं आढळलं

point

महिलांनी 20 ते 30 हजार रुपयांचे सामान चोरले

point

घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

Viral News : राजस्थानातील जोधपूरच्या चैतन्यशील शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलांची टोळी चोऱ्या करताना दिसत आहेत. चोरी करताना त्या महिला अगळीवेगळी शक्कल लढवून चोरी करताना दिसताहेत. एकाच वेळी हजारो रुपयांची चोरी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. चित्रपटाला देखील लाजवेल असा थ्रिलर चोरीतून समोर आला आहे.

हे ही वाचा : लेकीकडे आलेल्या सासूला जावयाने दगडाने ठेचून ठार मारलं, लेकीनं सांगितला घटनेचा थरार

लेहेंग्यांमध्ये मोठे खिसे आणि बॅग शिवल्याचं आढळलं

राजस्थानमध्ये महिला पारंपारिक जड पद्धतीचे लेहेंगे परिधान केलेले दिसतात. त्याच लेहेंग्यांमध्ये विशेष असे मोठे खिसे आणि बॅग शिवल्याचं आढळून आलं होतं. याच महिला आपला स्वत:ची टोळी बनवून आपण ग्राहक असल्याचं भासवून फिरत आहे. एक महिला दुकानदाराशी बोलत असताना दुसरी महिला तुपाचे डब्बे, ड्राई फ्रुट्स आणि कॉस्मेटिक्स आपल्याच लेहंग्यातील चोर खिश्यात ठेवतात. 

महिलांनी 20 ते 30 हजार रुपयांचे सामान चोरले

पार्श्वनाथ सिटी येथील 'ग्रीन ग्रॉसर स्टोर'मध्ये काही महिलांनी 20 ते 30 हजार रुपयांचे सामान चोरले. चोरी केल्यानंतर एक महिला टॅक्सी उभी असलेल्या ठिकाणी पळू लागली होती, जिथे एक पुरुष तिथं उभा होता. महिला धावत असताना तिच्या लेहंग्यातून तूपाचा डबा पडला. तेव्हा एका व्यक्तीने ते पाहिले इतक्यातच महिलेनं क्षणाचा कसलाही विलंब न करता ती टॅक्सीत बसली. तेव्हा त्या व्यक्तीने याबाबतची माहिती दुकानदाराला सांगितली होती.  

हे ही वाचा : वजन कमी करण्यासाठी यूट्यूब व्हिडीओ पाहून 'तो' पदार्थ खाल्ला, रात्रीतून जीव गेला...

घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

नंतर दुकानदाराने सीसीटीव्ही तपासले असता, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. सीसीटीव्हीमध्ये महिला कैद झाली आहे.  फुटेजमध्ये महिलांचे चेहरे आणि पळून जाणाऱ्या टॅक्सीचा नंबर प्लेट स्पष्टपणे दिसतो.  पोलीस आयुक्तालयाने शहरातील व्यवसायिकांना अलर्ट केलं आहे. पोलिसांचं म्हणणं असं की, ही एक संघटित टोळी आहे. ती गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या करताना दिसतात. पोलिसांनी टॅक्सीचा नंबर घेऊन ठेवला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp