लेकीकडे आलेल्या सासूला जावयाने दगडाने ठेचून ठार मारलं, लेकीनं सांगितला घटनेचा थरार

मुंबई तक

crime news : जावयानेच आपल्या सासूच्या डोक्यात दगडाने हल्ला करत ठेचून ठार मारलं. नंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला होता. तक्रारीनुसार, आरोपी जावयावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या घटनेचा थरार लेकीनं सांगितला आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जावयाने सासूला दगडाने ठेचून संपवलं 

point

लेकीनं मांडली व्यथा 

Crime news : उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जावयानेच आपल्या सासूच्या डोक्यात दगडाने हल्ला करत ठेचून ठार मारलं. नंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला होता. तक्रारीनुसार, आरोपी जावयावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे.  ही घटना कोतवाली परिसरातील आझादपुरा परिसरात घडल्याचं सांगण्यात येत आहे. जावयाने नाव सोबरन सिंग असे आहे, तर मृत सासूचे नाव मुन्नी आहे. 

हे ही वाचा : मुंबईचं महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव, भाजपच्या गोटातून 'या' नगरसेविकेचं नाव सर्वात आघाडीवर

जावयाने सासूला दगडाने ठेचून संपवलं 

कोतवाली परिसरातील आझादपुरा करीमनगर परिसरातील रहिवासी सोबरन सिंग यांचे पत्नी रश्मीसोबत कौटुंबिक वाद होता. या घटनेची माहिती रश्मीचा आई म्हणजेच जावई सोबरन सिंगची सासू मुन्नीला समजताच तिने लेकीचं सासर गाठलं, पण नराधम जावयाने मुन्नीवर दगडाने हल्ला करत सासूला संपवलं. सासू ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.  

कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. गंभीर जखमी मुन्नीला उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी नंतर तिला मृत घोषित केलं. याच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत सासूचे मृतदेह ताब्यात घेतला होता, नंतर तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान आरोपी सोबरन सिंग या जावयावर पुढील कारवाई केली जाईल असं सांगितलं जात आहे. 

हे ही वाचा : 'सापावर विश्वास ठेवावा पण, पोरींवर नाय...'; 'रुबाब'चा ट्रेलर पाहून नागराज मंजुळेही झाले थक्क!

लेकीनं मांडली व्यथा

लेक रश्मीने सांगितलं की, तिचा नवरा तिला नेहमी मारहाण करायचा. त्याच्याच त्रासाला कंटाळून रश्मीने त्याच्यासोबत न राहण्याचा निर्णय घेतला होता. नवऱ्याने तिच्यावर हल्ला केला, मुलीच्या सांगण्यावरून आई तिच्या सासरी आली आणि तिने आपल्या जावयाला काही गोष्टी समजून सांगितल्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने रश्मीच्या आईला मारहाण करत संपवलं.  

हे वाचलं का?

    follow whatsapp