MLC Election: निलंबनावर सत्यजित तांबेंनी सोडलं मौन; म्हणाले, 'एकदा...'

Maharashtra legislative council election 2023, Satyajeet Tambe : पक्षाची शिस्त मोडल्याप्रकरणी काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. त्यावर आता तांबेंनी भूमिका मांडली.
satyajeet tambe First Reaction on suspension for six year by congress
satyajeet tambe First Reaction on suspension for six year by congress

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसतंर्गत झालेला गोंधळ आणि त्यानंतर महाविकास आघाडीतील विसंवाद चव्हाट्यावर आला. काँग्रेसकडून सुधीर तांबेंना उमेदवारी जाहीर झालेली असताना त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसनं आता तांबेंवर निलंबनाची कारवाई केलीये. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या कारवाईवर सत्यजित तांबेंनी भूमिका मांडलीये.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसची चांगलीच पंचाईत झाल्याचं पाहायला मिळालं. यानिमित्तानं काँग्रेसमधील प्रादेशिक गटातटाचं राजकारणही चर्चेत आलं. सुधीर तांबेंऐवजी सत्यजित तांबे यांनी अर्ज भरला.

काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबन, सत्यजित तांबे काय म्हणाले?

सत्यजित तांबेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे काँग्रेसच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित झाले. काँग्रेसनं सत्यजित तांबे यांना 6 वर्षांसाठी निलंबित केलं आहे. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल बोलताना अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी भूमिका मांडली आहे.

satyajeet tambe First Reaction on suspension for six year by congress
विधान परिषद : भाचा की पक्ष? बाळासाहेब थोरांतांची काँग्रेसकडूनच कोंडी!

"मी गेली अनेक वर्षे पक्षाचे काम निष्ठापूर्वक केले आहे. त्यामुळे थेट कारवाई करण्यापूर्वी एकदा आमची बाजू समजून घ्यायला हवी होती. मात्र, आता मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. ही निवडणूक मी अपक्षच लढणार आहे", असं सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे.

तांबे यांच्या कारवाईवर नाना पटोले काय म्हणाले?

सत्यजित तांबे यांची काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. त्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाष्य केलं आहे. पटोले म्हणाले, "सत्यजित तांबे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. तांबे परिवाराचं काय झालं? याच्याशी आम्हाला काही भाष्य करायचं नाही."

satyajeet tambe First Reaction on suspension for six year by congress
विधान परिषद: सत्यजीत तांबेंना भिडणारी 'वाघीण'; कोण आहेत शुभांगी पाटील?
"माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमचे नेते आहेत. ते सध्या उपचारासाठी रुग्णालयात आहे. त्यांच्याशी आम्ही नंतर याविषयी चर्चा करू. त्यांची काय भूमिका आहे, ते पाहू", असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरातांचं मौन कायम

सत्यजित तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे तांबे कुटुंबाने घेतलेल्या भूमिकेची बाळासाहेब थोरातांना कल्पना असावी, अशी चर्चा आहे. काँग्रेसचे नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्यासह काही नेत्यांनी भूमिका मांडल्या असल्या, तरी तांबे कुटुंबियांशी जवळचे संबंध असलेल्या बाळासाहेब थोरांतानी मात्र काहीही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे थोरात कधी मौन सोडणार याकडे काँग्रेसबरोबरच महाविकास आघाडीचंही लक्ष लागलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in