नागपुरातील सिग्नल दुपारी 12 ते 4 या वेळेत बंद राहणार, नेमकं कारण काय?
योगेश पांडे, नागपूर: नागपुरात गेल्या काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना सिग्नलवर थांबून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. यासाठीच नागपूर पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय आज घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना तसेच वाहतूक पोलिसांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. नागपूर शहरातील वाढत तापमान लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी 21 चौकांमधील सिग्नल हे […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, नागपूर: नागपुरात गेल्या काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना सिग्नलवर थांबून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. यासाठीच नागपूर पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय आज घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना तसेच वाहतूक पोलिसांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
नागपूर शहरातील वाढत तापमान लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी 21 चौकांमधील सिग्नल हे दुपारी 12 ते 4 या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
सध्या उन्हाचा तापमानाचा पारा सरासरी 45 अंशावर जाऊन पोहचला असून सूर्यनारायण जणू आग ओकत असल्याने प्रचंड चटके नागपूरकरांना सहन करावे लागते आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी ज्या याठिकाणी फारशी गर्दी नसते आणि सिग्नल बंद असले तरी वाहतूक कोंडी होणार नाही असे 21 सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय प्रायोगिक तत्वावर घेण्यात आला आहे.
यामध्ये काचीपुरा, बजाज नगर, लक्ष्मी नगर, माता कचेरी, कन्नमवार चौक, आकाशवाणी चौक, जीपीओ चौक, सायन्स कॉलेज चौक, अहिंसा चौक, आग्याराम देवी चौक, सरदार पटेल चौक, वैद्यनाथ चौक, मनपा झोन 4 ऑफिस, नरेंद्रनगर, कडबी चौक,10 नंबर पुलिया, भीम चौक, जपानी गार्डन, पोलीस तलाव, राठोड लॉन चौकवरील सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहे.