Gateway of India Boat Accident: 'स्पीड बोट चालक तर स्टंटच...', 'तो' Video शूट करणाऱ्या तरुणाने सगळंच सांगितलं!

मुंबई तक

Mumbai Gateway of India Boat Accident: गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटा गुहेकडे जाणाऱ्या नीलकमल नावाच्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिली. ज्याचा व्हीडिओ शूट करणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने आता नेमकी घटना सांगितली आहे.

ADVERTISEMENT

'तो' Video शूट करणाऱ्या तरुणाने सगळंच सांगितलं!
'तो' Video शूट करणाऱ्या तरुणाने सगळंच सांगितलं!
social share
google news

मुंबई: मुंबईत बुधवारी संध्याकाळी गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा दरम्यान जाणाऱ्या नीलकमल या फेरी बोटला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली. या घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 115 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर दोन जण बेपत्ता असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, हा अपघात आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने आता संपूर्ण घटनेची माहिती मुंबई Tak ला दिली आहे.

गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटा गुहेकडे जाणाऱ्या नीलकमल नावाच्या बोटीला दुपारी ३.५५ वाजता नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिली, त्यानंतर बोट उलटली. या घटनेनंतर लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि पोलिसांनी एअरक्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य केले.

दरम्यान, नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारतीय नौदलाच्या स्पीड बोटीचे इंजिन चाचणी मुंबईतील समुद्रात सुरू असताना इंजिनमध्ये बिघाड झाल्याने चालकाचे बोटीवरचे नियंत्रण सुटले, त्यामुळे ही घटना घडली.

स्पीड बोट चालक स्टंट करतोय असं वाटलं म्हणून मी मोबाइलमध्ये Video शूट केला - प्रत्यक्षदर्शी

दरम्यान, या अपघाताचा नेमका व्हीडिओ हा राजस्थानच्या जालोर येथील रहिवासी श्रवण कुमारने आपल्या मोबाइलमध्ये शूट केला होता. जेव्हा अपघात झाला तेव्हा स्वत: श्रवण कुमार हा नीलकमल बोटीमध्ये होता. श्रवणने सांगितले की, 'नौदलाची स्पीड बोट स्टंट करत होती. म्हणून मी, मोबाइलमध्ये त्यांचा व्हीडिओ शूट करायला सुरूवात केली. पण काही क्षणातच बोट आमच्या फेरीला धडकली.'

हे वाचलं का?

    follow whatsapp