मॅरेथॉनमध्ये धावला नंतर जीवच गमावला! 20 वर्षीय तरुणाच्या मृत्यूने सगळेच हादरले

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

20 year old student dies of heart attack after running marathon madurai tamilnadu story
20 year old student dies of heart attack after running marathon madurai tamilnadu story
social share
google news

देशभरात हार्ट अटॅकच्या ( Heart Attack) घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहे. सध्या तर 20-30 वर्षातल्या तरूणांना देखील हार्ट अटॅकने मृत्यू होत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत मॅरेथॉनमध्ये ( Marathon) पळताना फीट आली आणि रूग्णालयात दाखल करताच तरूणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली. दिनेश (20) असे या मृत तरूणाचे नाव आहे. या तरूणाच्या मृत्यूने आता कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी (Police) या प्रकरणात तक्रार दाखल करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच पोलिसांनी तरूणाच्या मृत्यू मागचे कारण शोधायला सुरुवात केली आहे. (20 year old student dies of heart attack after running marathon madurai tamilnadu story)

ADVERTISEMENT

तमिळनाडूच्या (Tamilnadu) मदुराईमध्ये उशिरम येथे रक्तदानानिमित्त मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये अनेक तरूणांनी सहभाग नोंदवला होता. काल्लाकुरीचीच्या 20 वर्षीय दिनेशने देखील या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. ही मॅरेथॉन दिनेशने आरामात पुर्ण केली होती. त्याला कोणतीच अडचण आली नव्हती. मात्र मॅरेथॉनच्या तासाभरानंतर त्याला त्रास व्हायला सुरूवात झाली. दिनेशला अस्वस्थ वाटतं होते, यासाठी तो बाथरूममध्ये गेला. यावेळी दिनेशला फीट आली. त्यामुळे दिनेशच्या मित्रांनी त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल केले होते.

हे ही वाचा : Crime: नवऱ्याला खुंटीला बांधलं अन् बायकोवर तिघांकडून गँगरेप

दरम्यान दिनेशला आपातकालीन विभागात लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. रूग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार, दिनेशला रूग्णालयात दाखल केल्याच्या दीड तासानंतर हार्ट अटॅक आला होता. डॉक्टरांनी दिनेशला वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला, साधारण अर्धा तास त्याचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र नंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. या घटनेने कुटंबियांना मोठा धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर आता मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच या घटनेने तमिळनाडू एकच खळबळ माजली आहे.

हे ही वाचा : पुण्यात खळबळ! आधी पत्नी-पुतण्याला घातल्या गोळ्या, नंतर केली आत्महत्या

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT