निष्पापांचे बळी घेणाऱ्या मसूद अजहरचं संपूर्ण कुटुंब ठार, Air Strike मध्ये कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू

मुंबई तक

Operation Sindoor Kills Masood Azhar Family : पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय.

ADVERTISEMENT

Operation Sindoor Latest News Update
Operation Sindoor Latest News Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा

point

अजहरच्या कुटुंबातील मृतांवर आज होणार अंत्यसंस्कार

point

हल्ल्यानंतर मसूद अजहर नेमकं काय म्हणाला?

Operation Sindoor Kills Masood Azhar Family : पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय. भारताने एअरस्ट्राईक करून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा करत त्यांचे अड्डे उद्धवस्त केले. विशेष म्हणजे भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचा मोस्ट वॉन्डेट दहशतवादी मसूद अजहरचा कुटुंबियांचाही खात्मा झाला आहे. जैश-ए-मोहम्मद संघटनेचा दहशतवादी अजहरच्या कुटुंबातील 10 सदस्य मारले गेले आहेत. तसच या हल्ल्यात अजहरचे 4 खास सहकाऱ्यांनाही ठार मारण्यात आलं आहे.

पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे अजहरच्या कुटुंबियांना कंठस्नान देण्यात आलं आहे. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्यात कुटुंबियांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केलीय. अजहरच्या कुटुंबातील मृत सदस्यांवर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहे, असं या संघटनेकडून सांगण्यात आलंय.

हे ही वाचा >> 'पाकिस्तानमधून भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात...' ऑपरेशन सिंदूरनंतर Army च्या पत्रकार परिषदेत मोठं विधान

कुटुंबाचा खात्मा झाल्यानंतर मसूद अजहर काय म्हणाला?

दहशतवादी संघटनेकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटलंय की, दहशतवादी मसूद अजहरची मोठी बहीण आणि त्यांचं पूर्ण कुटंबिय, मुफ्ती अब्दुल रौफचे नातू-नाती या हल्ल्यात मारले गेले आहेत. तर कुटुंबातील अनेक सदस्य जखमी झाले आहेत. हल्ल्यात कुटुंबियांचा मृत्यू झाल्यानंतर मसूद अजहरने म्हटलं की, माझाही मृत्यू झाला असता, तर चांगलं झालं असतं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या ऑपरेशनचं नाव 'ऑपरेशन सिंदूर' ठेवलं. मागील आठवड्यात झालेल्या बैठकांमद्ये पीएम मोदी यांनी स्पष्ट केलं होतं की, पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदू पुरुषांना टार्गेट केलं होतं. ज्यामुळे त्यांच्या पत्नी विधवा झाल्या होत्या. त्यामुळे भारताकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, या हल्ल्यात 90 दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येतेय. भारतीय एजेन्स रॉकडून सर्व टार्गेटबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर लष्कर आणि जैशच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला.

हे ही वाचा >> ऑपरेशन सिंदूर हल्ल्याची सूत्र हाताळणाऱ्या महिला अधिकारी सोफिया कुरैशी कोण?  

हे वाचलं का?

    follow whatsapp